जागतिक क्रिकेटमध्ये असे काही फलंदाज आहेत, ज्यांनी विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावले आहे. कसोटी क्रिकेटमधील महान फलंदाजांच्या यादीत त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा ऍलिस्टर कूक खेळायला फलंदाजी करत होता तेव्हा गोलंदाजांसाठी त्याला बाद करणे कठीण काम होते, पण क्लब क्रिकेटमध्ये एका १५ वर्षांच्या मुलाने कूकला त्रिफळाचीत करून चर्चेत आणले आहे. खरं तर इंग्लंडमधील एका स्थानिक क्लब सामन्यादरम्यान ऍलिस्टर कूकला 15 वर्षीय गोलंदाज कायरन शॅकलटनने शानदार चेंडूवर बाद केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कूक क्लब क्रिकेटमध्ये बेडफोर्डशायर संघाचे प्रतिनिधित्व करत होता. जो पॉटन टाऊन सीसी विरुद्धच्या सामन्यादरम्यान, कूक 15 वर्षीय गोलंदाजासमोर उभा राहू शकला नाही आणि गोलंदाजीनंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात प्रथम खेळताना जो पॉटन टाऊन सीसीने 3 बाद 154 धावा केल्या ज्यात शॉन स्टीव्हन्सने 105 धावा केल्या, त्यानंतर बेडफोर्डशायर फलंदाजीला आले, तेव्हा त्यांना 12 षटकात 7 बाद 128 धावाच करता आल्या. वास्तविक हा सामना 12 षटकांचा होता.
Sir Alastair Cook made his annual appearance for Bedfordshire Farmers CC this evening.
He was clean bowled by 15-year-old Kyran Shackleton, who wasn’t even born when Cook made his Test debut.
Brilliant scenes at @PottonTownCC ???? pic.twitter.com/8yhB5WvsRJ
— Cricket District (@cricketdistrict) May 23, 2022
बेडफोर्डशायरकडून खेळताना कूकने 20 धावा केल्या. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे 15 वर्षीय गोलंदाजाने कूकला गोलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वेगळे झाल्यानंतर अजूनही कूक क्रिकेट खेळत आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये कूक एसेक्सकडून खेळतो आणि याशिवाय त्याला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तो क्रिकेटमध्ये आपला सहभाग नोंदवत असतो.
दरम्यान, कूकने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 161 कसोटी सामन्यांमध्ये 12,472 धावा केल्या आहेत. ज्यात 33 शतके आणि 57 अर्धशतकांचा समावेश आहे. यात कूकने एका सामन्यांत सर्वाधिक २९४ धावा बनवल्या आहेत. कूकने 92 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. ज्यात त्याने एकूण ३,२०४ धावा केल्या आहेत. याशिवाय 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याच्या नावे ६१ धावा आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है”, मिलरच्या ट्वीटला राजस्थानचा भन्नाट रिप्लाय
‘फ्लाइंग कौर’! हवेत झेपावत हरमनप्रीतने घेतला अप्रतिम झेल; Video भन्नाट व्हायरल





