अमेरिकन ओपन 2022 (यूएस ओपन) स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवून स्पेनच्या कार्लोस अल्कारझने इतिहास रचला आहे. हे त्याचे कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम ठरले आहे. रविवारी (11 सप्टेंबर) अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कारझची लढत नॉर्वेच्या कॅस्पर रूडसोबत पार पडली. अल्कारझने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रूड याचा 6-4, 2-6, 7-6(1), 6-3 पराभव केला.
The dream becomes reality.@carlosalcaraz is a Grand Slam champion. pic.twitter.com/sPFaAiVFNR
— US Open Tennis (@usopen) September 11, 2022
कार्लोस अल्कारझ (Carlos Alcaraz )हा पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात खेळत होता आणि त्याने विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली आहे. आर्थर ऐश स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात कार्लोसने चार सेटमध्ये हा सामना जिंकला. या हंगामातील त्याचा हा 51वा विजय आहे. यासह वयाच्या 19 व्या वर्षी जेतेपद जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तसेच यूएस ओपनला 32 वर्षांनंतर सर्वात तरुण चॅम्पियन मिळाला आहे.
CARLOS ALCARAZ IS THE US OPEN CHAMPION pic.twitter.com/hogFduedq0
— US Open Tennis (@usopen) September 11, 2022
कार्लोसने या विजयाबरोबरच आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. तो राफेल नदाल नंतर सर्वात कमी वयात ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिसपटू ठरला आहे. स्पेनच्या नदालने 2005मध्ये फ्रेंच ओपन जिंकले होते. तेव्हा त्याचे वय 19 वर्ष आणि 3 दिवस होते. तर पीट सॅम्प्रस यांच्यानंतर सर्वात कमी वयात यूएस ओपन जिंकणारा खेळाडू ठरला आहे. सॅम्प्रस यांनी 1990मध्ये यूएस ओपन जिंकले होते. तेव्हा त्यांचे वय 19 वर्ष 28 दिवस होते. तर कार्लोसचे वय 19 वर्ष 129 दिवस आहे.
Lift the trophy, @carlosalcaraz! 🏆
Let the confetti fly 🎉 pic.twitter.com/F2cfoFX0lO
— US Open Tennis (@usopen) September 12, 2022
पहिलवहिले ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या कार्लोसने एटीपी क्रमवारीत पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे. तो पहिल्या स्थानावर पोहोचणारा राफेल नदाल (22 वर्ष), कार्लोस मोया (22) आणि जुआन कार्लोस फेरेरो (23) यांच्यानंतर चौथा स्पॅनिश टेनिसपटू ठरला आहे. तर उपविजेता कॅस्पर रूड (Casper Ruud) सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
At 19 years 4 months – the YOUNGEST ATP No.1 EVER 🤯
🇪🇸 CARL1TOS 🇪🇸#USOpen @carlosalcaraz pic.twitter.com/1BVjEifDB1
— Tennis TV (@TennisTV) September 11, 2022
कार्लोसचा यूएस ओपनमधील प्रवास-
कार्लोसने या स्पर्धेतील चौथ्या फेरीमध्ये (राउंड 4) मारिन चिलिच विरुद्ध खेळताना पाच सेटमध्ये विजय मिळवला. तर उपांत्यपूर्वचा 5 सेटचा सामना जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली.
उपांत्य फेरीतही चार सेटच्या सामन्यामध्ये विजय मिळवत कारकिर्दीतील पहिल्या ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. कार्लोसने मागील वर्षीच यूएस ओपनमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा तो उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता.
Feels like the first of many for Carlos Alcaraz. pic.twitter.com/EfpFqBzvVP
— US Open Tennis (@usopen) September 11, 2022
कार्लोस हा मॅन्युएल ओरेन्टेस आणि नदाल नंतर यूएस ओपन जिंकणारा तिसरा स्पॅनिश ठरला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडू स्वतःच्या चुकीमुळे नाराज; म्हणाला, ‘माफ करा, पराभवाची जबाबदारी…’
सर्वात भीषण आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेला एकमेव क्रिकेटपटू, लाराविरूद्ध केलेले नेतृत्व
श्रीलंकेला विजयाच्या ‘वीरू स्टाईल’ शुभेच्छा; पाकिस्तानलाही मारला टोमणा