---Advertisement---

ऍलेक्स केरीने दाखवली अफलातून हुशारी, सीमारेषेवर टिपला अप्रतिम झेल; पाहा व्हिडिओ

On: बुधवार, जुलै 7, 2021 11:20 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर आहे. या दौर्‍यावर उभय संघात पाच टी२० व तीन वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत. ९ जुलै रोजी पहिल्या टी२० सामन्याने दौरा सुरू होईल. वेस्ट इंडिज दौर्‍यावर पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने मंगळवारी (६ जुलै) इंट्रा-स्क्वॉड सामना खेळला. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ऍलेक्स केरीने सीमारेषेवर शानदार झेल घेतला. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकताच शेअर केला.

असा झाला सामना
टी२० सामने सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ इंट्रा-स्कॉड सामना खेळला. एका संघाचे नेतृत्व ऍरॉन फिंच व दुसऱ्या संघाचे नेतृत्व मॅथ्यू वेडने केले. वेडच्या संघाने निर्धारित २२ षटकात फटकेबाजी करत १९३ धावा धावफलकावर लावल्या. डॅनियल ख्रिश्चनने सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात फिंचच्या संघाने मिचेल मार्शच्या अर्धशतकाच्या व एश्टन टर्नरच्या ४७ धावांच्या जोरावर हे आव्हान एक षटक शिल्लक असताना पार केले.

एलेक्स केरीचा शानदार झेल
या सामन्यात वेडच्या संघाला पराभव पत्करावा लागला असला तरीही, त्याच्या संघातील ऍलेक्स केरी याने सीमारेषेवर एक अफलातून झेल पकडला. मिचेल मार्शने सामना जवळपास खिशात घातला असतानाच, तो षटकार मारण्याच्या मनसुब्यात होता. मीचील स्वॅपसनच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात त्याने लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू भिरकावला. मात्र, त्या ठिकाणी तैनात असलेल्या केरीने हुशारी दाखवत तो षटकार झेलामध्ये बदलला. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ-
अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), मोझेस हेनरिक्स, मिशेल मार्श, ऍश्टन टर्नर, ऍश्टन अगर, डॅनियल ख्रिश्चन, ऍलेक्स केरी, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिपे, मॅथ्यू वेड, वेस अगर, जेसन बेहरेन्डॉर्फ, जोश हेजलवुड, रिले मेरीडिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वॅपसन, ऍन्ड्र्यू टाय व ऍडम झंपा.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित अन् ‘हा’ फलंदाज करणार ओपनिंग, शॉला इंग्लंडला पाठवण्याची मागणी निवडकर्त्यांनी फेटाळली!

इंग्लंड संघात कोरोनाची एंट्री, भारतीय खेळाडूंच्या बचावासाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; करणार ‘हे’ काम

तब्बल ३५० वनडे सामने खेळणाऱ्या धोनीबद्दल ‘या’ गोष्टी क्रिकेटप्रेमीला माहित हव्याच!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---