---Advertisement---

वॉर्नरऐवजी हैद्राबाद संघात या खेळाडूचा झाला समावेश 

On: सोमवार, एप्रिल 2, 2018 8:00 PM
---Advertisement---

आयपीएल ६ दिवसांवर आलेले असतानाच काही दिवसांपूर्वी सनरायझर्स हैद्राबाद संघाला एक धक्का बसला होता. त्यांचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर चेंडू छेडछाड प्रकरणामुळे बीसीसीआयने यावर्षीच्या त्याच्या आयपीएलमधील सहभागावर बंदी घातली आहे.

त्यामुळे हैद्राबाद संघाला त्याचा बदली खेळाडू घेण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार हैद्राबाद संघाने आज इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्सची वॉर्नरचा बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे.

हेल्स यावर्षीच्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला होता. पण आता हैदराबादने त्याला एक कोटी रुपये किंमत मोजून संघात घेतले आहे. त्याने आत्तापर्यंत १७४ ट्वेन्टी २० सामन्यात २८.८५ च्या साहाय्याने ४७०४ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला ट्वेन्टी२० क्रिकेट खेळण्याचा चांगला अनुभव आहे.

तसेच हेल्स नुकताच पीएसएलमध्ये खेळला आहे. या स्पर्धेत त्याची कामगिरी चांगली झाली होती.

डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली आहे. चेंडू छेडछाड प्रकरणात वॉर्नर मुख्य सूत्रधार म्हणून आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

तसेच त्याने चेंडू छेडछाड प्रकरणानंतर हैद्राबाद संघाचे कर्णधारपदही सोडले होते. यानंतर केन विलियमसन या न्यूझीलंडच्या कर्णधाराकडे हैद्राबादचेही नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

हैद्राबाद संघाचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध ९ एप्रिलला होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment