---Advertisement---

इंग्लंडला मोठा धक्का, विश्वचषकातून हा खेळाडू झाला बाहेर

On: मंगळवार, एप्रिल 30, 2019 1:45 PM
---Advertisement---

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज ऍलेक्स हेल्सने 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या इंग्लंडच्या संघातून माघार घेतली आहे. सोमवारी(29 एप्रिल) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने(ईसीबी) याबद्दल पुष्टी दिली आहे.

याबरोबरच हेल्सने आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या एकमेव वनडे सामन्यातून आणि पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेतूनही त्याचे नाव मागे घेतले आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने(ईसीबी) हेल्सवर उत्तेजीत करणाऱ्या ड्रग्सचे सेवन केल्याने 21 दिवसांची बंदी घातली आहे. हेल्सवर दुसऱ्यांदा अशी बंदी घातली आहे. याआधी 2017 मध्ये नाईटक्लब बाहेर मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली होती.

ईसीबीने हेल्सवर घातलेल्या बंदीबद्दल म्हटले आहे की ‘इंग्लंड संघाच्या भल्यासाठी तसेच संघातील चांगल्या वातावरणाचे पालन व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.’

याबरोबरच ईसीबीचे व्यवस्थापकीय संचालक ऍशली गिल्स यांनी असेही म्हटले आहे की हा हेल्सच्या कारकिर्दीचा शेवट नाही.

हेल्सने इंग्लंडकडून 70 वनडे सामने खेळले असून यात त्याने 37.79 च्या सरासरीने 2419 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 6शतकांचा आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

ईसीबी आयर्लंड आणि पाकिस्तान तसेच विश्वचषकासाठी त्याच्या बदली खेळाडूची घोषणा काही  दिवसांत करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

रिषभ पंतची विकेटकिपिंगमध्ये कमाल, घेतले हे दोन अफलातून झेल, पहा व्हिडिओ

कोलकता विरुद्ध मैदानात पाऊल ठेवताच रोहित शर्माच्या नावावर झाला हा खास विक्रम

…म्हणून ऍरॉन फिंचने मानले धोनी आणि कोहलीचे आभार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment