---Advertisement---

विराटच्या परदेशी चाहतीने लुटला इंग्लंडच्या पराभवाचा आनंद, मग काय भिडले ट्विटरवॉर

On: शुक्रवार, फेब्रुवारी 26, 2021 4:18 PM
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला १० विकेट्सने पराभूत केले. अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने भारतापुढे अवघ्या ४९ धावांचे लक्ष्य उभारले. भारतीय सलामीवीरांनी नाबाद राहत सहजरीत्या हे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.

भारतीय संघाच्या दणदणीत विजयानंतर विरोधक इंग्लंड संघाच्या खेळाडूंची चाहते चांगलीच थट्टा करत आहे. अशात विराटची चाहती आणि इंग्लंडची महिला क्रिकेटपटू ऍलेक्स हार्टले हिनेही एक ट्विट केले. ज्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी तिला धारेवर धरले आहे.

झाले असे की, ऍलेक्सने २ दिवसातच सामना संपल्यानंतर मजेत ट्विट करत लिहिले की, ‘चला बरे झाले. आज रात्री आमचा सामना सुरू होण्यापुर्वीच इंग्लंडच्या पुरुषांचा सामना संपला.’ तिच्या या ट्विटनंतर इंग्लंडचा क्रिकेटपटू रॉरी बर्न्सचा पारा चढल्याचे दिसून आले. त्याने तिला प्रत्युत्तर देत लिहिले की, ‘आम्ही महिला क्रिकेटला इतका पाठिंबा देत असताना ही अत्यंत हताश करणारी वागणूक.’

भलेही बर्न्सने असे प्रत्युत्तर देत निराशा व्यक्त केली. मात्र काही वेळानंतर त्याने हे ट्विट डिलिट केले. परंतु तोवर अनेकांनी त्याच्या ट्विटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

बर्न्सव्यतिरिक्त इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बेन डकेट यानेही ऍलेक्सवर टीका केली आहे. त्याने म्हटले की, ‘सरासरी ट्विट. मला नाही वाटत की कोणता इंग्लंडचा पुरुष क्रिकेटपटू महिला क्रिकेटपटूंच्या पराभवानंतर असे ट्विट करेल.’

यानंतर आपल्या वक्तव्याचे अनेकांनी चुकीचे अर्थ काढल्याने ऍलेक्सने स्पष्टीकरण दिले आहे. ‘माझ्या ट्विटचे वेगवेगळे संदर्भ लावले आहेत. माझा कोणता वाईट हेतू नव्हता. आपण सगळे कसोटी क्रिकेटचे प्रशंसक आहोत,’ असे ती म्हणाली.

 

ऍलेक्सविषयी सांगायचे झाले तर, ती विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. आयपीएलदरम्यान ती विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पाठिंबा देताना दिसते. ऍलेक्स ही फिरकी गोलंदाज आतापर्यंत तिने इंग्लंडकडून २८ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान तिने ३९ विकेट्स घेतल्या आहेत. तर ४ टी२० सामन्यात ३ विकेट्सची कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गेलचे ‘सलवार चॅलेंज’ बघून हसू आवरणार नाही, पहा मजेशीर व्हिडीओ

वहिनी आल्या, तेही लाडक्या परीला घेऊन!! विराटला चीयर करण्यासाठी अनुष्कासह वामिकाही अहमदाबादमध्ये दाखल

खेळपट्टी कशी होती हे तुम्ही नाही ठरवायचं; रोहित-विराटच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भडकला इंग्लंडचा कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---