---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूला होणार ५ वर्षांची शिक्षा; पैज जिंकण्यासाठी ठेवले होते महिलेशी संबंध

On: गुरूवार, जुलै 2, 2020 5:21 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। एका झोपेत असणाऱ्या महिलेवर बलात्कार करण्याचा आरोप ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलेला क्रिकेटपटू ऍलेक्स हेपबर्नवर करण्यात आला होता, त्यामुळे त्याला तुरूंगात टाकण्यात आले होते. त्याने आपल्या शिक्षेविरुद्ध अपील केली होती, जी मंगळवारी (३० जून) फेटाळून लावली आहे.

२४ वर्षीय हेपबर्नने मागील वर्षी एप्रिल महिन्यात व्हॉट्सऍपवर आयोजित केलेल्या एका स्पर्धेत भाग घेतल्यानंतर एका महिलेशी हाणामारी केली होती. त्यामुळे त्याला महिलेवर अत्याचार करण्याच्या आरोपाखाली तुरूंगात टाकले होते.

हेपबर्नची अपील फेटाळली

ऑस्ट्रेलियाचा माजी वर्सेस्टरशायर खेळाडू हेपबर्नला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले गेले होते, परंतु त्या महिलेवरील हल्ल्याच्या प्रकरणात त्याला मुक्त करण्यात आले.

फिर्यादी बाजूने सांगतिले होते, तो खेळाडू एक प्रकारच्या पैजेत सामील होता की महिलांबरोबर कोण किती झोपू शकतो. त्यामुळे त्याने एप्रिल २०१७ मध्ये इंग्लंडच्या वर्सेस्टर येथील आपल्या फ्लॅटमध्ये हे कृत्य केले होते. खटल्याच्या वेळी, हेपबर्नला तुरूंगवासाची शिक्षा सुनावणारे न्यायाधीश जिम टिंडल यांनी या खेळाडूला ‘अपरिपक्व’ म्हटले होते.

या निकालात मुख्य न्यायाधीश लॉर्ड बर्नेट यांच्यासह तीन ज्येष्ठ न्यायाधीशांनी हेपबर्नचे अपील फेटाळून लावत म्हटले होते की “गुन्हेगार असुरक्षित नाही.”

इंग्लंडच्या लायन्सबरोबर खेळला आहे

हेपबर्नचे वकील डेव्हिड इमॅनुएलने (David Emanuel) म्हटले, की संदेशांमध्ये कोणत्याही गोष्टीचे समर्थन करण्यात आले नव्हते.

खटल्यादरम्यान, क्रिकेटपटूचा बचाव करणाऱ्या वकिलाने खेद व्यक्त केला. हेपबर्नला सुरुवातीला एका ज्यूरीने ओरल बलात्काराचा दोषी ठरविले होता. परंतु त्याच बलात्काराशी संबंधित आणखी एका बलात्कार प्रकरणात त्याला मुक्त केले होते. हेपबर्नने ज्या महिलेवर हल्ला केला त्या महिलेने तिचे नाव माध्यमांसमोर उघड केले नाही.

वर्सेस्टरशायर क्राऊन कोर्टमध्ये झालेल्या ४ दिवसीय सुनावणी दरम्यान  त्याने संपूर्ण घटनेचे वर्णन केले. बोलताना त्याने तो हेपबर्न आणि त्याच्या संघाचा जोडीदार जो क्लार्क हे सेक्स्युअर एनकाउंटर मध्ये अडकल्याचे सांगितले. क्लार्क हा इंग्लंड लायन्स या आंतरराष्ट्रीय संघाचा फलंदाज होता. क्लार्क आणि ती महिला एका नाईट क्लब मध्ये भेटले होते. सुनावणी दरम्यान त्या महिलेने सांगितले की, तिने क्लार्क सोबत सहमतीने सेक्स केले होते. तसेच पुढे बोलताना ती म्हणाली की, क्लार्क आजारी असल्या कारणाने सकाळीच आपली खोली रिकामी केली होती.

हेपबर्नने वर्सेस्टरशायरकडून खेळताना २ अ दर्जाचे आणि ५ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ३२ आणि टी२० मध्ये २५ धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ६ आणि टी२०मध्ये ६ विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---