---Advertisement---

जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू जोकोविचला पराभूत करत झ्वेरेवची फायनलमध्ये धडक

---Advertisement---

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) पुरुष एकेरीतील उपांत्य सामना पार पडला. हा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविच आणि तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात झाला. या सामन्यात झ्वेरेवने जोकोविचला १-६, ६-३, ६-१ अशा सेटमध्ये पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले आहे.

या सामन्याचा पहिला सेट जोकोविचने अप्रतिम खेळी करत ६-१ ने जिंकला. मात्र, पुढील दोन्हीही सेटमध्ये त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. ३४ वर्षीय जोकोविचला तब्बल १० वर्ष लहान असलेल्या झ्वेरेवने सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये धूळ चारली. (Alexander Zverev defeats Novak Djokovic and reach the Tokyo 2020 final)

https://twitter.com/atptour/status/1421046449215741955

झ्वेरेव्हने जर्मनीसाठी तीन स्पर्धात्मक ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि तो आपल्या देशात काही काळ अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू होता.

झ्वेरेव अंतिम सामन्यात कारेन खाचनोवचा सामना करेल.

जोकोविचची ऑलिंपिक कामगिरी
जोकोविचच्या ऑलिंपिक कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर सर्बियाच्या या दिग्गज खेळाडूने आतापर्यंत चार ऑलिंपिकमध्ये भाग घेतला आहे. यामध्ये जोकोविचने एकदाही सुवर्ण पदक जिंकले नाही. तथापि, २००८ च्या बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिंपिक व्यतिरिक्त त्याला इतर ऑलिंपिक स्पर्धांमध्ये हवे तसे यश मिळाले नाही. २००८ मधील बीजिंग ऑलिंपिकमधील जोकोविचचा सर्वोत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकले होते.

ऑलिंपिक २००८ च्या यशानंतर, जोकोविच त्याच्या पुढील दोन ऑलिंपिक प्रवासामध्ये खास कामगिरी करू शकला नाही. अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोने त्याला २०१२ आणि २०१६ मध्ये ऑलिंपिकमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. एँडी मरेने दोन्ही ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---