पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. वनडे विश्वचषक 2023 च्या साखळी फेरी टप्प्यात संघाचे प्रदर्शन अतिशय सुमार राहिले होते. त्यानंतर टी20 विश्वचषक 2024 मध्येही अमेरिकेसारख्या नवख्या संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. या पराभवानंतर जागतिक पातळीवर पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली होती. अशातच आता पाकिस्तानात जन्मणाऱ्या पण अमेरिकेकडून क्रिकेट खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज अली खानने पाकिस्तान संघाबाबत मोठे विधान केले आहे.
अमेरिका संघाचा खेळाडू अली खानने एका व्हिडिओ मुलाखतीदरम्यान पाकिस्तानबद्दल सांगितले की, मला वाटते की जर आम्हाला पुन्हा पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर आम्ही त्यांना पराभूत करू शकतो. मी पाकिस्तानी संघाचा अपमान करत नाही आहे, पण मला वाटते की आता आमची बाजू खूप चांगली आहे आणि आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने मैदानात उतरलो तर आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. पण जर आम्हाला पुन्हा पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर ती आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट असू शकते.
Ali Khan – “No Disrespect to Pakistan Team, but we (🇺🇸) are Capable of beating them again”
– I agree with Ali, as many associate nations is capable of beating Pakistan anywhere anyday anytime 🤐 (SCO 🏴 and NED 🇳🇱 in race too)#Cricket #PAKvENG pic.twitter.com/zJe6o34SBn
— Richard Kettleborough (@RichKettle07) September 11, 2024
दरम्यान अली खानबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा जन्म पाकिस्तानात झाला आणि त्याने क्रिकेटची कलाही तिथेच आत्मसात केली. अली 18 वर्षांचा असताना तो आपल्या आई-वडिलांसोबत अमेरिकेत शिफ्ट झाला. त्यानंतर, अली तेथे अनेक खाजगी लीगमध्ये खेळला आणि त्यानंतर त्याला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकाराची विकेट घेतली. अली खानने 2019 मध्ये अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने अमेरिका संघाकडून 15 वनडे सामन्यांमध्ये 33 विकेट्स आणि 14 टी20 सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा-
IND vs BAN: कडेकोट बंदोबस्तात खेळवली जाणार कानपूर कसोटी, खेळाडूंसाठीही विशेष सुरक्षा व्यवस्था
99 टक्के मेहनत, 1 टक्के मज्जा, रोहित शर्माचा हा व्हिडिओ तुम्ही 1000 वेळा पाहाल
7 षटकार 52 धावा, 273 चा स्ट्राईक रेट, मुंबईच्या माजी क्रिकेटरचा विध्वंसक अंदाज!