भारतात अनेक असे खेळाडू आहेत, जे मैदानात आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. तसेच त्यांच्या लूक्समुळे आणि हटके स्टाइलमुळे सोशल मीडियावर देखील त्यांना कोट्यावधी लोक फॉलो करत असतात. विराट कोहली हा भारतात सर्वात जास्त फॉलो केला जाणारा क्रिकेटपटू आहे. विराटप्रमाणे जर्मनीची ॲथलीट एलिसा श्मिट देखील आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून असते. तिचे बोल्ड आणि हटके फोटोज् सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. तसेच सौंदर्याच्या बाबतीत ती अभिनेत्रीला देखील फेल करू शकते.
जर्मनीत राहणारी २२ वर्षीय ॲथलिट एलिसा श्मिट ही टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कसून सराव करत आहे. तिची मैदानातील कामगिरी पाहता तिला जर्मनीची भविष्यातील स्टार खेळाडू समजले जात आहे.
https://www.instagram.com/p/COYM1cYFhAM/?igshid=1qdtv2lricsvz
जगातील सर्वात बोल्ड ॲथलिट
२०१७ मध्ये एलिसाला एक मॅगझिन बस्टेड कवरेजने जगातील सर्वोत्कृष्ट बोल्ड ॲथलिट महिला म्हणून घोषित केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर अलिसाबद्दल चर्चा रंगायला सुरुवात झाली होती.
https://www.instagram.com/p/CN0ItVklfY5/?igshid=s2rvng6orai7
कनिष्ठ स्पर्धेत जिंकले रौप्यपदक
एलिसाने ज्युनिअर स्तरावर करिअरची सुरूवात केली होती. तिने २०१७ मध्ये झालेल्या अंडर-२० युरोपीयन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ४×१०० रिले आणि ४०० मीटर स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.
https://www.instagram.com/p/CDb0aCnF3wO/?igshid=1qad2mbrt86u0
इंटरनेटवर एलिसाचीच हवा
एलिसा इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय असते आणि तिचे १.६ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी फोटोज् पोस्ट करत असते. ट्रॅक करत असतानाचा फोटोज् असो वा सुट्टीतील ती प्रत्येक फोटोमध्ये हॉट दिसते.
https://www.instagram.com/p/CBdp-5IlIqW/?igshid=ymu3b85ufqsk
https://www.instagram.com/p/B9cY3urlIGQ/?igshid=33ps12jzgr2p
लहापणापासूनच व्हायचे होते ॲथलिट
एलिसाचा जन्म, १९९८ मध्ये जर्मनीच्या वॉर्म्स मध्ये झाला होता. तिने वयाच्या सातव्यावर्षी धावायला सुरुवात केली होती. हायस्कूलनंतर तिने ॲथलेटीक्समध्ये कारकीर्द करण्यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केली होती. जेव्हा तिला असे वाटले की जर्मनीच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याची आपल्यात क्षमता आहे, तेव्हा ती बर्लिनमध्ये आली आणि एससीसी स्पोर्ट्स क्लबबरोबर सराव करण्यास सुरुवात केला.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC फायनलपुर्वी ‘या’ किवी फलंदाजाचा दणका, सलग दुसरे शतक झळकावत टीम इंडियाला दिले आव्हान
कसोटी चॅम्पियनशीप फायनल: दमदार प्रदर्शनानंतरही ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना बसावे लागू शकते बाकावर






