---Advertisement---

ऍशेसपूर्वी इंग्लंड संघाला कूकचा कानमंत्र; ‘त्या’ मालिकेची करून दिली आठवण

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 12:54 AM
england-cricket-team
---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट संघ ऍशेस मालिकेसाठी आधीच ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. संघाला पहिला कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळायचा आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाची कामगिरी खूपच प्रभावी आहे. ऑस्ट्रेलियाची आजवरची कामगिरी पाहता इंग्लिश संघाचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने इंग्लंडला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. कूकच्या मते, जर इंग्लंडने पहिली कसोटी गमावली नाही, तर उर्वरित मालिकेत क्रिकेट चाहत्यांना बरीच स्पर्धा पाहायला मिळेल. येत्या ८ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये ऍशेस मालिका सुरू होणार असून, या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वामुळे त्यांना विजयाचे दावेदार मानले जात आहे. इंग्लंडच्या संघाला कर्णधार जो रूटकडून शानदार कामगिरीची अपेक्षा असेल. तर बेन स्टोक्सच्या पुनरागमनामुळे संघाचे मनोबल नक्कीच उंचावेल. कूकने आपल्या स्तंभात इंग्लंडला ब्रिस्बेनमध्ये प्रभावी कामगिरी करण्याचा सल्ला दिला. २०१०-११ च्या दौऱ्यावर पहिला कसोटी सामना अनिर्णित राहूनही इंग्लंडचा संघ कसा चांगला खेळला होता हे कूकने सांगितले आहे. त्याने म्हटले की, ब्रिस्बेनमधील पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडला ‘हार मानू नका’ हा माझा सर्वोत्तम सल्ला आहे. जर इंग्लंड येथे जिंकला तर, संघासाठी एक चांगली मालिका असेल. ऑस्ट्रेलियातील ऍशेस मालिकेदरम्यान आम्ही या मैदानावर हमखास पराभूत झालो आहोत. २०१०-११ मध्ये आम्ही पहिल्या डावात २२१ धावांनी पिछाडीवर असतानाही येथे पहिली कसोटी अनिर्णित ठेवली होती. तेव्हापासून या मैदानावर खेळताना यजमानांवर दडपण आले.’

सन २०१०-११ च्या ऍशेस मालिकेत, इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीवर ३-१ असा पराभव केला होता. यादरम्यान कूकने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ७ डावात १२७.६७ च्या सरासरीने ७६६ धावा केलेल्या. कूकच्या मते, इंग्लंड संघाला ब्रिस्बेनमध्ये जिंकणे आवश्यक नाही, त्यांना फक्त संघ हरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कूक पुढे म्हणाला, ‘तुम्हाला ब्रिस्बेनमध्ये जिंकण्याची गरज नाही. परंतु या मैदानावर तुम्ही फक्त हरता कामा नये. जर तुम्ही ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले तर मालिकेत तुम्ही वर्चस्व राखू शकतात.’

या मैदानावर पराभूत न होण्याचा ऑस्ट्रेलियाचा दीर्घकाळचा विक्रम भारतीय संघाने या वर्षाच्या सुरुवातीला मोडला होता. अशा स्थितीत यजमानांवर दडपण असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---