---Advertisement---

सीएसकेच्या फलंदाजांना अडचणीत आणणारा फझल फारूखी आहे तरी कोण?, घ्या जाणून

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 11:44 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असलेला राशिद खान दमदार कामगिरी करताना दिसतोय. राशिद शिवाय आणखी एक अफगाण खेळाडू आहे जो चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्याही आयपीएल संघाचा भाग नसताना हा अफगाणी वेगवान गोलंदाज चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांना त्रास देतोय. हा युवा वेगवान गोलंदाज आहे फझल हक फारूखी. आज आपण त्याच फझलविषयी जाणून घेणार आहोत.

फझलची आतापर्यंतची क्रिकेट कारकीर्द

फझल हा अफगाणिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म २० सप्टेबर २००० रोजी अफगाणिस्तानच्या बाघल येथे झाला होता. २० वर्षीय अफगाणने आतापर्यंत झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे. त्या सामन्यात त्याने ४ षटकांत २७ धावा देऊन एक गडी बाद केला. आपल्या लहानशा कारकीर्दीत फझलने आतापर्यंत घरगुती सामन्यांमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या १२ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये २२ बळी आपल्या नावे केले आहेत.

त्याचबरोबर त्याने ७ लिस्ट-ए सामन्यांत ७ बळी मिळवले आहेत. फझलला केवळ दोन टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. २०२० च्या १९ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केल्यानंतर फझल पहिल्यांदा चर्चेत आला. त्याने चार सामन्यांत पाच बळी घेतले. त्यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट ५.१२ एवढा मामुली होता. या विश्वचषकातील त्याच्या वेगाने क्रिकेट दिग्गजांना खूप प्रभावित केले होते.

सीएसकेचा नेट बॉलर आहे फझल

आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर फजलने आयपीएलमधील संघांचे लक्ष वेधून घेतले. या हंगामात तो एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सचा नेट बॉलर म्हणून भाग आहे. आयपीएलचा प्रत्येक संघ त्यांच्या सराव सत्राचे व्हिडिओ शेअर करत असतो.

सीएसकेच्या सरावादरम्यान फझलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या व्हिडिओमध्ये फझल आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे सीएसकेच्या फलंदाजांना अडचणीत आणताना दिसला. यात रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू आणि ऋतुराज गायकवाड अशा फलंदाजांची नावे आहेत. फझल आयपीएल २०२० वेणी किंग्स इलेव्हन पंजाबसाठी देखील नेट बॉलर म्हणून सहभागी झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---