टी20 विश्वचषकाचा (2022 T20 World Cup) नारळ ऑस्ट्रेलियात फुटला आहे. पहिल्याच सामन्यात दुबळ्या नामिबियाने आशिया चषक विजेत्या श्रीलंका संघाचा दारुण पराभव करत उलटफेर घडवला. असे असले तरी सर्व चाहत्यांना 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान (INDvPAK) सामन्याची प्रतीक्षा आहे. क्रिकेटविश्वातील हे दोन्ही मातब्बर संघ ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थात एमसीजी (MCG) आमने-सामने येथील. त्याचवेळी या मैदानाचा इतिहास कसा राहिला आहे व भारतीय संघाची या मैदानावरील कामगिरी कशी आहे, हे आपण जाणून घेऊया.
क्रिकेटजगतातील सर्वच चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याची वाट पाहत असतात. मागील विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागलेला. तसेच, आशिया चषकाच्या महत्त्वाच्या सामन्यातही पाकिस्तानने भारताला पराभूत केलेले. या पराभवांचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी एमसीजीवर उतरेल. भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर चार सामने खेळले आहेत. हे चारही सामने भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेले. यातील दोन सामन्यात भारताने विजय मिळवलेला आहे. तर, एका सामन्यात पराभव संघाला पत्करावा लागलेला. अन्य एका सामन्याचा निकाल लागला नाही.
या मैदानावर 15 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेलेत. या सर्व सामन्यात ऑस्ट्रेलिया सहभागी झालेला. यावर्षी विश्वचषकात या मैदानावर सात सामने खेळले जातील. यामध्ये अंतिम सामन्याचा देखील समावेश आहे. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्या व्यतिरिक्त पात्रता फेरीतून पुढे येणाऱ्या संघाविरुद्ध देखील याच मैदानावर सामना खेळेल. एमसीजी हे जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मानले जाते. या मैदानाची आसन क्षमता एक लाखांपेक्षा जास्त आहे. 1992 वनडे विश्वचषक व 2015 वनडे विश्वचषकाचे अंतिम सामने देखील याच मैदानावर खेळले गेले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
T20WC: पहिल्याच सामन्यात ‘आशिया चॅम्पियन’ ची पोलखोल, नामिबियाचा श्रीलंकेवर मोठा विजय
टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात नामिबियाचा कहर, श्रीलंकेला दिले 164 धावांचे टारगेट