प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये अश्या होतील प्ले-ऑफच्या लढती

प्रो कबड्डी सीजन ७ अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. ग्रेटर नोएडा येथे सीजन ७ चा शेवटचा लेग कालच पूर्ण झाला. सर्व लेगनंतर १२ पैकी ६ संघ हे प्ले-ऑफससाठी पात्र ठरले आहेत.

ट्रान्सस्टॅडिया, अहमदाबादच्या इको एरेना येथे विवो प्रो कबड्डी लीग सीझन ७ च्या प्ले-ऑफसचे सामने पार पडणार आहेत. १४ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान प्ले-ऑफचे सामने होतील. दबंग दिल्ली, बंगाल वारियर्स, यूपी योद्धा, यु मुंबा, हरियाना स्टीलर्स व बेंगळुरू बुल्स हे सहा संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत.

प्ले-ऑफमध्ये सुरुवातीला एलिमीनेटरचे सामने होतील. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या यूपी योद्धा विरुद्ध सहावा क्रमांकवर असलेल्या बेंगळुरू बुल्स यांच्यात पहिला एलिमीनेटरचा सामना होईल. तर चौथा क्रमांकवर असलेल्या यु मुंबा विरुद्ध पाचव्या क्रमांकावर असलेल्या हरियाना स्टीलर्स यांच्यात दुसरा एलिमीनेटरचा सामना होईल. दोन्ही सामने १४ ऑक्टोबरला होतील.

१६ ऑक्टोबर ला प्ले-ऑफसमध्ये उपांत्य फेरीच्या लढती होतील. पहिल्या क्रमांकावर असलेल्या दबंग दिल्ली विरुद्ध एलिमीनेटर १ चा विजेता दोनहात करेल. तसेच दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बंगाल वारियर्स विरुद्ध एलिमीनेटर २ चा विजेता असा सामना होईल.

त्यानंतर उपांत्यफेरीतील 2 विजेत्या संघांमध्ये १९ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना होईल.

You might also like