---Advertisement---

काय सांगता! टी20 विश्वचषकातील सर्व चॅम्पियन संघ हरले, यंदा मिळणार नवा विजेता?

On: सोमवार, ऑक्टोबर 31, 2022 1:10 PM
IND-vs-SA
---Advertisement---

टी20 विश्वचषकाचा 8वा हंगाम ऑस्ट्रेलिया मध्ये खेळला जातोय. आतापर्यंत 6 संघांनी किमान एकदा तरी ही स्पर्धा जिंकली आहे. परंतू सध्याच्या हंगामात या सर्व संघाना आतापर्यंत कमीत कमी एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ रविवारी (दि.30 ऑक्टोबर) पहिल्यांदा पराभूत झाला. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 5 गडी राखून मात केली. याप्रकारे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका वगळता सर्व संघाना टी20 विश्वचषकाच्या या हंगामात पराभव स्विकारावा लागला आहे.

भारत दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी राहिला. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत भारताने 133 धावा केलेल्या. यामध्ये सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने धमाकेदार अर्धशतक लगावले. मात्र, एडेन मार्करम (Aiden Markram) आणि डेविड मिलर (David Miller) या दोघांनी अर्धशतकीय खेळी करत त्यांच्या संघाला विजय प्राप्त करून दिला. भारतीय संघ आता 2 नोव्हेंबरला बांग्लादेश विरूद्ध मैदानात उतरणार आहे.

श्रीलंकेने 2014 साली टी20 विश्वचषक जिंकलेला. मात्र, यावर्षी त्यांना पहिल्याच फेरीत नामिबीयासारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाकडून पराभव स्विकारावा लागला. हा विश्वचषक सुरू होण्याआधीच काही दिवसा अगोदर त्यांनी आशिया चषक जिंकला होता. सुपर-12 ची गोष्ट केली तर इथे आतापर्यंत त्यांना दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

यजमान ऑस्ट्रेलिया हा टी20 विश्वचषकाचा गतविजेता संघ आहे. मागच्या वर्षी ओमान आणि युएईमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी न्यूझीलंडला हरवतं या चषकावर नाव कोरलेले. पण, सध्याच्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात न्यूजीलंड संघाने त्यांना 89 धावांनी पराभव केला. त्यांचे आता उपांत्य फेरीत पोहचणे देखील अवघड झाले आहे.

https://twitter.com/ICC/status/1583768685084278784?s=20&t=W70Vi8htzeyHgmamifN0Gg

इंग्लंडने देखील 2010 मध्ये हा चषक आपल्या नावी कोरलेला. मात्र, जोस बटलर याच्या नेतृत्वाखाली खेळणारा या संघाला कमकुवत समजल्या जाणाऱ्या आयर्लंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. परंतू हा संघ अजून उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाहिये.

पाकिस्तानने 2009 मध्ये टी20 विश्वचषक जिंकलेला. मागच्या वर्षी देखील तो संघ उपांत्य फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरलेला. मात्र, या हंगामात त्यांना पहिल्यांदा भारताकडून तर दुसऱ्यांदा झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारावा लागला. तसेच या संघाचे उपांत्य फेरीत पोहचण्याचे स्वप्न भंग झाले आहे.

दोन वेळा टी20 विश्वचषक जिंकणारा एकमेव संघ वेस्ट इंडिज, मात्र यंदा त्यांना सुपर 12मध्ये प्रवेशही करता आला नाही. त्यांनी 2012 आणि 2016 मध्ये टी20 विश्वचषक जिंकला.

भारताविषयी बोलायचे झाले तर भारत 15 वर्षांपासुन टी20 विश्वचषकाची वाट बघतोय. भारतीय संघाने 2007 मध्ये एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली एकमात्र वेळेस टी20 विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केलेला. सध्याच्या हंगामात भारतीय संघाने खेळलेल्या 3 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे तर एका सामन्यात दक्षिण अफ्रिकेविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
धक्कादायक, विराटच्या हॉटेल रुमचा व्हिडिओ लीक; किंग कोहलीचा राग अनावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---