लंडन येथे सुरू असलेला ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. महिला दुहेरीत ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत कोरियाच्या जोडीने पराभूत केल्याने स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. यापूर्वी भारताचे सर्व अनुभवी बॅडमिंटनपटू पराभूत झाल्याने, आता भारताला स्पर्धेतून विनापदक माघारी यावे लागणार आहे.
Not the ending anyone wanted but one of the most memorable performance by our THUNDER WOMEN ⚡️.
Proud of you Treesa/Gayatri, keep it up!
📸: @badmintonphoto #AllEngland2023#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/nuhHsZjjJg
— BAI Media (@BAI_Media) March 18, 2023
महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत जॉली-गायत्री जोडीचा सामना कोरियन जोडी बाएक ना हा व ली सो ही कि या जोडीसह झाला. जागतिक क्रमवारीत विसाव्या स्थानी असलेल्या हा व की जोडीने 21-10,21-10 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. जॉली-गायत्री जोडीला विजेतेपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र, अखेरीस कोरियन जोडीने आपला अनुभव दाखवत भारतीय जोडीला स्पर्धेतून बाहेर काढले.
भारतीय संघाला यावेळी अनेक पदकांची अपेक्षा या स्पर्धेत होती. पुरुष एकेरीत लक्ष सेन, किदंबी श्रीकांत व एचएस प्रनॉय या खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. पुरुष दुहेरी सात्विक-साईराज जोडी देखील अपयशी ठरलेली. तर, महिला एकेरी पीव्ही सिंधू ही दुसऱ्याच फेरीतून बाहेर झाली होती.
(All England Badminton Championship 2023 India Out Of Compitition After Defeat Of Tressa Gayatri In womens Doubles)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीसंतच वेगळंच असतं! आयपीएलसाठी पाठिंबा एका संघाला आणि जिंकण्याची प्रार्थना दुसऱ्या संघासाठी
महिला आरसीबीच्या सुमार खेळीसाठी विराट, डिविलियर्स आणि ‘हा’ दिग्गज जबाबदार? माजी गोलंदाजाचे मोठे विधान