---Advertisement---

सर्व माहितीः असे पाहा एमपीएलचे सामने लाईव्ह, तिकीटांपासून ते टाईमटेबल सर्वकाही एका क्लिकवर

Maharashtra Premier League
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जवळपास 14 वर्षांच्या अंतराने आपली एमपीएल स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी आयोजित होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये एकूण 6 संघ सहभाग घेत आहेत. मंगळवारी (13 जून) एमपीएल 2023ची सविस्तर माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून मिळाली. यात वेळापत्रकासह सामन्याचे ठिकाण, वेळ आणि तिकांटाची माहितीही मिळाली. चला तर जाणून घेऊन एमपीएल 2023 विषयी महत्वाच्या सर्व गोष्टी.

एमपीएल 2023 स्पर्धा ही महाराष्ट्रातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन आणि हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित केली जात आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून भारतीय संघाला आजपर्यंत अनेक दर्जेदार क्रिकेटपटू मिळाले आहेत. एमपीएलमधूनही पुढे देशाला आशाच पद्धतीने क्रिकेटपटू मिळण्याचा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लीगची सुरुवात गुरुवारी (15 जून) होणार आहे.

लीगमध्ये सहभागी होत असल्ल्या संघांची नावे पुणेरी बाप्पा, कोल्हापूर टस्कर्स, ईगल नाशिक टायटन्स, सोलापूर रॉयल्स,छत्रपती संभाजी किंग्स आणि रत्नागिरी जेट्स अशी आहेत. पहिला सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स संघात गुरुवारी सायंकाली 8 वाजता सुरू होणार आहेत. त्याआधी सायंकळी 5.30 वाजता एमपीएल 2023च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन केले गेले आहे. अमृता खानविलखर या सोहळ्यात लाईव्ह परफॉर्म करणार आहे. लीगचा अंतिम सामना 29 जून रोजी सायंकाळी 8 वाजता सुरू होईल.

एमपीएल घरबसल्या लाईव्ह पाहू इच्छित असणाऱ्यांना डीडी स्पोर्ट्सवर हे सर्व सामने पाहायला मिळतील. सोबत फॅनकोडवर या सामन्यांच्या ऑनलाईन स्टिंमिंग केली जाणार आहे. सामन्याच्या प्रत्यक्ष मैदानात जाऊन आंनद घ्यायचा असेल तर पुण्यातील एमसीए स्टेडियमवर सर्वांना मोफत प्रवेश असेल. दुपारचे सामने 2 ते 5.20 वाजेता खेळले जातील, तर सायंकळचे सामने 8 ते 11.20 वाजता आयोजित केले गेले आहेत. (All information about MPL 2023 schedule, live streaming and ticket booking)

https://www.instagram.com/p/Ctbg65KoPrR/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

एमपीएलचे सामने आणि वेळा
1. 15 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
2. 16 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (दुपारी- 2 ते 5.20)
3. 16 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
4. 17 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
5. 18 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (दुपारी – 2 ते 5.20)
6. 18 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
7. 19 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
8. 20 जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी- 2 ते 5.20)
9. 20 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
10. 21 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
11. 22 जून- छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी – 2 ते 5.20)
12. 22 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
13. 23 जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
14. 24 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (दुपारी – 2 ते 5.20)
15. 24 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
16. 26 जून- क्वालिफायर 1
17. 27 जून- एलिमिनेटर
18. 28 जून- क्वालिफायर 2
19. 29 जून- अंतिम सामना

महत्वाच्या बातम्या –
भारीच! ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री करणार एमपीएलच्या उद्धाटन सोहळ्यात लाईव्ह परफॅार्म
KL Rahul । भारतीय संघाची चिंता दूर! प्रमुख स्पर्धेआधी सलामीवीर संघात परतण्याची पूर्ण शक्यता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---