मराहाष्ट्रातील गुवणंत क्रिकेटपटूंना एक हक्काच व्यासपीठ देण्याच्या हेतूने यावर्षीपासून एमपीएल स्पर्धा पुन्हा एखदा सुरू होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने हे एक धाडसी पाऊल म्हणता येईल. यावर्षी एमपीएलमध्ये एकूण 6 संघ सहभाग घेणार आहेत. गुरुवारी (15 जून) या लीगची सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्याआधी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडेल.
एमपीएलच्या (MPL 2023) उद्घाटन सोहळ्यासाठी क्रीडा, कला आणि राजकीय श्रेत्रांतील अनेकजण उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्शन असेल ती अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar). ही मराठमोठी अभिनेत्री एमपीएलच्या उद्घाटन समारंभातवेळी लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहे. खास अमृताचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहायला येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असू शकते. एमसीएकडून क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमीही दिली आहे. उद्घाटन सोहशा आणि 15 ते 29 जूनदरम्यान लीगचे सर्व सामने प्रेक्षक मैदानात येऊन विनामुल्य पाहू शकणार आहेत.
एमपीएलचे सामने आणि वेळा
1. 15 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
2. 16 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (दुपारी- 2 ते 5.20)
3. 16 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
4. 17 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
5. 18 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (दुपारी – 2 ते 5.20)
6. 18 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
7. 19 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
8. 20 जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी- 2 ते 5.20)
9. 20 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
10. 21 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
11. 22 जून- छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी – 2 ते 5.20)
12. 22 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
13. 23 जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
14. 24 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (दुपारी – 2 ते 5.20)
15. 24 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
16. 26 जून- क्वालिफायर 1
17. 27 जून- एलिमिनेटर
18. 28 जून- क्वालिफायर 2
19. 29 जून- अंतिम सामना
(Amrita Khanwilkar will perform live at the opening ceremony of MPL 2023)
महत्वाच्या बातम्या –
KL Rahul । भारतीय संघाची चिंता दूर! प्रमुख स्पर्धेआधी सलामीवीर संघात परतण्याची पूर्ण शक्यता
कुस्ती महासंघाच्या निवडणूकीची घोषणा! ‘या’ तारखेला पार पडणार मतदार आणि निकाल