आयसीसी वनडे विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यावर्षी विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे असून 5 ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा सुरू होणार आहे. यावर्षीचा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतासह ऑसट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान असे काही संघ प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मागच्या विश्वचषकात देखील भारत विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार होता. पण उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताला पराभव मिळाल्यामुळे विश्वचषक जिंकता आला नाही. आपण या लेखात 2019 विश्वचषकातील विक्रमांचा आढावा घेणार आहोत.
विश्वचषक 2019चे (World Cup 2023) विजेतेपद इंग्लंडकडे होते. यजमान संघाने मायदेशातील परिस्थितीचा फायदा उचलत अंतिमसामन्यात न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली होती. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकात 8 विकेट्सच्या नुकसानावर 241 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनेही 50 षटकात 241 धावा केल्या. सामना बरोबरीत सुटल्यानंतर पंचांनी सुपर ओव्हर खेळवली, ज्यामध्ये इंग्लंडने बाजी मारली. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला मात्र निर्णायक सहा चेंडूंमध्ये 14 धावा केल्या आणि एक धाव कमी पडल्यानंतर पराभव स्वीकारला.
फलंदाजांचे विक्रम –
वनडे विश्वचषकाचा हा 12 हंगाम होता, ज्यामध्ये इंग्लंडने दिमाखात ट्रॉफी उंचावली. अंतिम सामन्यात बेन स्टोक्स सामनावीर ठरला, ज्याने 84* धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. तसेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) मालिकावीर ठरला, याने संपूर्ण हंगामात 578 धावा केल्या होत्या आणि 2 विकेट्स देखील घेतल्या होत्या. रोहित शर्मा (Rohit Sharma) त्यावेळी भारतासाठी फलंदाज म्हणून खेळत होता. धोनीच्या नेतृत्वातील संघासाठी रोहितने विश्वचषक हंगामात सर्वाधिक 648 धावा केल्या होत्या.
तसेच ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याने हंगामात रोहितपेक्षा फक्त एक धाव कमी म्हणजेच 647 धावा केल्या होत्या. परिणामी वॉर्नर सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. हंगामात सर्वाधिक 5 शतके रोहित शर्मा याच्याच नावावर होती. तसेच वॉर्नरने विश्वचषकातील सर्वोत्तम 166 धावांची खेळी केली होती. यावर्षी हे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी विश्वचषक खेळणार असून पुन्हा एकदा सर्वाधिक धावांसाठी दोघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळू शकते. त्याव्यतिरिक्त या हंगामात सर्वाधिक 22 षटकार इंग्लंडचा कर्णधार ओयन मॉर्गन याने मारले होते.
सर्वोत्तम गोलंदाजी –
ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क 2019 विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि त्याने सर्वाधिक 27 विकेट्स नावावर केल्या. एका डावात सर्वोत्तम कामगिरी पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदी याने केली. शाहीनने बांगलादेशविरुद्ध 9.1 षटकात 35 धावा खर्च करून सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या होत्या. या विश्वचषकादरम्यान दोन गोलंदाज असे होते ज्यांनी आपल्या संघासाठी दोन सामन्यांमध्ये पाच विकेट्सचे हॉल नावावर घेतले होते. यातील पहिला गोलंदाज म्हणजे बांगलादेशचा मुस्थफिझूर रहीम आणि दुसरा म्हणजे मिचेल स्टार्क.
यष्टीरक्षकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी कुणाची?
न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम आपल्या संघासाठी यष्टीपाठी फायदेशीर ठरला. लॅथमने 10 सामने खेळले, ज्यामध्ये यष्टीमागून 21 फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व फलंदाज त्याने झेल घेऊन बाद केले. विश्वचषकादरम्यान, एका डावातील सर्वोत्तम प्रदर्शनाचा विचार केला, तर यष्टीरक्षक ऍळेक्स केरी याने ऑस्ट्रेलियासठी जबरदस्त कामगिरी केली होती. केरीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात यष्टीपाठून 5 खेळाडूंना तंबूत धाडले. यातील 4 खेळाडू केरीच्या हातात झेलबाद, तर स्टिंपिंग झाल्यामुळे बाद झाला. टॉम लँथमनेही अफगाणिस्तानविरुद्धच्या एका सामन्यात 5 विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिल्या होत्या.
सर्वाधिक झेल –
इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रुट याने मागच्या विश्वचषकात संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली होती. रुटने हंगामातील 11 सामन्यांमध्ये एकूण 13 झेल घेतले होते. एखाद्या खेळाडून त्यावर्षी विश्वचषकात घेतलेले हे सर्वाधिक झेल ठरले. तसेच ख्रिस वॉक्स याने एका डावात 4 विकेट्स घेतल्या क्षेत्ररक्षक म्हणून हंगामत सर्वोत्तम कामगिरी केली होती.
सर्वोत्तम भागीदारी –
विश्वचषक 2019 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी बांगलादेशविरुद्ध डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी मोठी भागीदारी केली होती. दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये 192 धावांची भागीदारी पार पडली, जे जोडीच्या रुपात हंगामातील सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्यावेळी सलामीला येणारा केएल राहुल यांनी विश्वचषक हंगाम चांगलाच गाजवला होता. या दोघांनी श्रीलंकेविरुद्धच्या एका सामन्यात 189 धावांची भागीदारी केली होती, जी सलामीवीर फलंदाजांची हंगामातील सर्वोत्तम भागीदारी देखील ठरली. (All major records from ICC World Cup 2019)
महत्वाच्या बातम्या –
भारताचा 27 वर्षांचा दुष्काळ संपला! मोहालीत ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा गर्वही तुटला; कॅप्टन राहुलची कमाल
भारतीय संघाचा ‘सूर्य’ 19 महिन्यांनी उगवला! ‘मिस्टर 360’ने केला खास पराक्रम, एकदा वाचाच