भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते मोठ्या काळापासून वाट पाहत आहेत. विश्वचषक 2023 मधील 12 व्या सामन्यात हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमने सामने असणार आहेत. शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान वनडे विश्वचषकात आतापर्यंत सात वेळा आमने-सामने आले असून, भारताने प्रत्येक वेळी वर्चस्व गाजवले आहे. या सामन्यांमध्ये आत्तापर्यंत कोण कोण सामनावीर ठरले आहे हे आपण पाहूया.
भारत आणि पाकिस्तान सर्वप्रथम 1992 विश्वचषकात आमने-सामने आले होते. त्यावेळी आपला पहिला विश्वचषक खेळत असलेल्या सचिन तेंडुलकरने शानदार खेळ करत सामनावीर पुरस्कार जिंकलेला. त्यानंतर 1996 मध्ये झालेल्या विश्वचषकातील रोमांचक सामन्यात भारताला भक्कम सलामी दिलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांना सामनावीर पुरस्काराने गौरवलेले. तर, इंग्लंडमध्ये झालेल्या 1999 विश्वचषकात पाकिस्तानचे कंबरडे मोडणारी गोलंदाजी केलेले व्यंकटेश प्रसाद सामनावीर ठरलेले.
भारत पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक असलेल्या 2003 वनडे विश्वचषक सामन्यात 98 धावांची यादगार खेळी केल्यानंतर सचिन तेंडुलकर सामनावीर ठरलेला. 2007 मध्ये दोन्ही संघ साखळी फेरीत गारद झाल्याने एकमेकांविरुद्ध खेळू शकले नव्हते. 2011 विश्वचषकात दोन्ही संघ उपांत्य फेरीत समोरासमोर आले. त्यावेळी अप्रतिम 85 धावांची खेळी करत सचिनने सामनावीर पुरस्कार पटकावला. 2015 मध्ये प्रथमच विश्वचषकात सचिन तेंडुलकरविना भारतीय संघ उतरला होता. त्यामध्ये विराट कोहलीने शानदार शतक करत सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले. तर, 2019 वनडे विश्वचषकात रोहित शर्मा याला त्याच्या शतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवले गेलेले.
त्यानंतर आता या सामन्यात कोण हा पुरस्कार जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
(All Man Of The Match Award Winners In India Pakistan World Cup Match)
महत्वाच्या बातम्या –
एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अजित भारद्वाजला दुहेरी मुकुट
दुसऱ्या राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ, स्पर्धेत राज्यातील सुमारे १५० खेळाडू सहभागी