---Advertisement---

पत्नीसोबत नाचतानाही अक्षरने सोडले नाही क्रिकेट, डान्स फ्लोअरवर लावला षटकार अन् पकडला कॅच; व्हिडिओ पाहाच

On: शनिवार, जानेवारी 28, 2023 11:28 AM
Axar-Patel
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू अक्षर पटेल याने नवीन वर्षाची सुरुवात थाटात केली आहे. अक्षरने 26 जानेवारी रोजी मेहा पटेल हिच्याशी संसार थाटला आहे. विशेष म्हणजे, अक्षरने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती घेतली होती. आता तो न्यूझीलंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाचा भाग नाहीये. यामागील कारण होते त्याचे लग्न. आता त्याच्या लग्नातील समारंभाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यातीलच एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अक्षर थिरकताना दिसत आहे. त्याने पत्नी मेहा पटेल हिच्यासोबत ठुमके लावले आहेत. यादरम्यानही त्याने क्रिकेटला सोडलेच नाही. कसे, ते चला जाणून घेऊयात…

अक्षरने लग्नातही सोडले नाही क्रिकेट
अक्षर पटेल (Axar Patel) याने पत्नी मेहा पटेल (Meha Patel) हिच्यासोबत ‘तेरे दिल से ना खेलूंगा’ या गाण्यावर डान्स केला. सध्या या गाण्याची चांगलीच क्रेझ आहे. या गाण्यातील ‘तेरे दिल से ना खेलूंगा’ या ओळी येताच, अक्षरने फलंदाजी आणि झेल घेण्याच्या मूव्हजही त्याच्या डान्समध्ये सामील केल्या. अक्षरने आधी षटकार मारण्याची आणि त्यानंतर झेल घेण्याची ऍक्शन केली. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1618666603864031232?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1618666603864031232%7Ctwgr%5Ea252a414eaedec73fafbd28aa95cb17cfedcb2ca%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-bapu-axar-patel-hit-six-on-the-dance-floor-with-his-wife-caught-the-catch-never-seen-such-a-dance-video-7686133.html

अक्षरने संघात भासू नाही दिली रवींद्र जडेजाची कमतरता
भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा मागील काही काळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत ‘बापू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षर पटेल याला ताफ्यात सामील करण्यात आले आहे. पटेलने मागील जे काही सामने खेळले, त्यात त्याने जडेजाची कमतरता भासू दिली नाही. त्याने बॅट आणि चेंडूने चांगली कामगिरी केली आहे.

अक्षर पटेलची कारकीर्द
भारतीय संघाचा अष्टपैलू अक्षर पटेल याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत भारतीय संघाकडून 8 कसोटी, 49 वनडे आणि 40 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने फलंदाजी करताना 249 धावा आणि गोलंदाजी करताना 47 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने 381 धावा आणि 56 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त टी20त त्याने 288 धावा आणि 37 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 15 जानेवारी, 2023 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत मालिकेत खेळला होता. (all rounder axar patel hit six on the dance floor with his wife meha patel see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्याने विराट-रोहितसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान, टी20त फक्त 5 भारतीयांना जमलीय ‘ही’ कामगिरी
‘असा विचारच केला नव्हता…’, कॅप्टन हार्दिक पंड्याने कुणावर फोडले पराभवाचे खापर?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---