भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू एकापाठोपाट लग्नबंधताना अडकताना सध्या दिसत आहेत. 23 जानेवारी रोजी भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि बॉलिबुड अभिनेत्री अथिया शेट्टी यांची लग्नगाठ बांधली गेली. अशातच गुरुवारी (26 जानेवारी) भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याचा ही विवाह संपन्न झाला. अक्षरने त्याची मैत्रीण मेहा पटेल हिच्यासोबत आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात गुरुवारी केली. लग्नातील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अक्षर पटेल (Axar Patel) आणि मेहा पटेल (Meha Patel) गुरुवारी गुजरातमधील वडोदरा येथे लग्नबंधतानात अडकले. लग्नातील (Axar Patel Meha Patel) फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. भारतीय क्रिकेटपटूनचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडले असून लग्नसाठी कुटुंबीय आणि मित्र उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. लग्नानंतर अक्षर स्वतः मित्र आणि कुटुंबियांसोबत डान्स करताना दिसला. लग्नासाठी त्याचा सहकारी खेळाडू आणि मित्र जयदेव उनाडकट आणि इतर काही क्रिकेपटू उपस्थित असल्याचेही सांगितले जात आहे. उनाडकटने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून काही फोटो देखील शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/reel/Cn2J4g5sIUX/?utm_source=ig_web_copy_link
तत्पूर्वी अक्षर आणि मेहाच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल जाले होते. यावेळीही अक्षरचा भन्नाट डान्स चाहत्यांना पाहायला मिळाला होता. अक्षरची पत्नी मेहा पटेल ही प्रोफेशनल डायटीशियन आणि न्यूट्रिशनयनिस्ट आहे. तसेच मेहला वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची देखील आवड आहे. माहितीनुसार मेहा तिचा 28 वा वाढदिवस साजरा करत असताना अक्षर पटेलने तिला प्रपोज केले होते.
https://twitter.com/Rajatgupta199/status/1618535801859747840?s=20&t=bhLGGCVWajjcoBsmC5Fh1Q
दरम्यान, भारतीय संघ सध्या न्यूझीलंड संघाविरुद्ध मायदेशात वनडे आणि टी-20 मालिका खेळत आहे. वनडे मालिकेत भारताने पाहुण्या न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला, तर उभय संघांतील टी-20 मालिका शुक्रवारी (27 जानेवारी) सुरू होईल. अक्षर पटेलने लग्नासाठी बीसीसीआयकडे सुट्टी मागितल्यामुळे त्याला या मालिकेसाठी निवडले गेले नव्हते. पण वर्षाच्या सुरुवातील भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळलेल्या केलेल्या वनडे आणि टी-20 मालिकेत मात्र अक्षर खेळला आणि चमकदार कामगिरी देखील केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये धोनीची अचानक एन्ट्री, खेळाडूंसह सपोर्ट स्टाफही खुश
‘शोले- 2 चा दुसरा भाग लवकरच येतोय’…क्रिकेटमधील जय वीरुची मोठी घोषणा






