2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 international world cup 2026) टीम इंडियाचा कोणता खेळाडू ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ ठरेल, असं विचारलं तर साहजिकच तुमच्या मनात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah OR Abhishek Sharma) किंवा अभिषेक शर्माचं नाव येईल. पण माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा (Aakash chopra) यांचं मत मात्र वेगळं आहे.
आकाश चोप्रा यांनी 2026 च्या वर्ल्ड कपसाठी स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याची (Hardik pandya) ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवड केली आहे. हा मोठा इव्हेंट भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून यात 20 संघ सहभागी होतील.
हार्दिकने 2024 च्या वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने 8 सामन्यांत 48 च्या सरासरीने धावा केल्या आणि 11 विकेट्सही घेतल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये त्याने 3 षटकांमध्ये 20 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामध्ये निर्णायक 17 वी आणि 20 वी ओव्हर त्यानेच टाकली होती. गेल्या वर्षीच्या सुरुवातीपासून भारताने 22 पैकी 19 टी-20 सामने जिंकले आहेत, त्यामुळे भारत या स्पर्धेत ‘फेव्हरेट’ म्हणून उतरेल.
2024 मध्ये जसप्रीत बुमराह ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ होता (15 विकेट्स, 4.17 इकॉनॉमी), पण 2026 साठी आकाश चोप्रा यांनी हार्दिकवर डाव लावला आहे. आकाश चोप्रा यांच्या मते ‘सुपर 8’ मधील भारत-ऑस्ट्रेलिया हा सामना सर्वात थरारक असेल. कोणत्याही टीमला 300 धावांचा टप्पा ओलांडता येणार नाही, असा त्यांचा अंदाज आहे. त्यांच्या मते या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 297 असू शकते.






