मागील 15 हंगामात एकदाही ट्रॉफी न जिंकणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल 2023मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आरसीबीचे विस्फोटक फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. मात्र, त्यांना सोमवारी (दि. 17 एप्रिल) स्पर्धेतील 24व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून 8 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. आरसीबीला पराभव पत्करावा लागला असला, तरीही त्यांच्या दोन खेळाडूंनी एक मोठा विक्रम रचला. फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी त्यांच्या विस्फोटक खेळीने विराट कोहली आणि केएल राहुल यांचा एक मोठा विक्रम मोडला.
झाले असे की, चेन्नई सुपर किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघापुढे 227 धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळी बेंगलोरला विराट कोहली (Virat Kohli) याच्या रूपात पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर झटका बसला. महिपाल लोमरोर हादेखील शून्य धावेवर तंबूत परतला. यावेळी संघाची धावसंख्या 2 बाद 15 इतकी होती. इथून पुढे फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल (Faf Du Plessis And Glenn Maxwell) यांनी डाव सांभाळला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 61 चेंडूत 126 धावांची भागीदारी रचली. तसेच, संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
यावेळी फाफने 33 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. तसेच, मॅक्सवेलने 36 चेंडूत 3 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 76 धावांची वादळी खेळी साकारली. एकेवेळी हे दोघेही संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होते, पण त्या दोघांच्या विकेट्समुळे बेंगलोर संघ 218 धावाच करू शकला. त्यामुळे त्यांना 8 धावांनी पराभूत व्हावे लागले.
Expect 𝙈𝘼𝙓 entertainment when the 𝘽𝙄𝙂 𝙎𝙃𝙊𝙒 gets going in style 😎@Gmaxi_32 clubbed eight sixes in his splendid 76-run knock 👌👌
Relive his entertaining innings here 🎥🔽 #TATAIPL | #RCBvCSK https://t.co/tI8cKxbFaC pic.twitter.com/nNfiXXiS6G
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलचा विक्रम भागीदारी विक्रम
फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी मिळून आयपीएल इतिहासात तिसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी रचली. तसेच, मोठा विक्रमही नावावर केला. यापूर्वी मोठी भागीदारी करण्याचा विक्रम विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या नावावर होता. त्यांनी 2016 आयपीएल हंगामात गुजरात लायन्सविरुद्ध 121 धावांची भागीदारी रचली होती. याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी बेंगलोरकडून ही सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी 2021च्या हंगामात शारजाह येथे मोठी भागीदारी केली होती. (all rounder glenn maxwel and skipper faf du plessis big partnership record for rcb ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कार्तिकसाठी ही मॅच फिनिश करणे हाताचा मळ होता, पण…’, आरसीबीच्या पराभवानंतर कर्णधाराचे लक्षवेधी विधान
कॉनवे-दुबेसह ‘या’ खेळाडूंचे एमएस धोनीकडून कौतुक, आरसीबीला घरच्या मैदानावर चारली पराभवाची धूळ