ऑस्ट्रेलिया संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेपूर्वीच भारतासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजा याने फिटनेस चाचणी पूर्ण केली आहे. तो लवकरच संघासोबत जोडला जाणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, गुरुवारपासून (दि. 2 फेब्रुवारी) नागपूर येथे सराव सत्र सुरू होत आहे. कारण, 9 फेब्रुवारीपासून पहिला कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (National Cricket Academy) म्हणजेच एनसीएकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या नागपूर कसोटी सामन्यात भाग घेण्याची मंजुरी मिळाली आहे. भाग घेण्यासाठी त्याच्या तयारीवर एक फिटनेस अहवाल बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) एनसीएद्वारे जारी करण्यात आला. त्यामध्ये त्याच्या नागपूर कसोटीसाठी संघात सामील होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1621055196062449664
रवींद्र जडेजा याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट 2022मध्ये खेळला होता. या सामना भारत विरुद्ध हाँगकाँग संघात खेळला गेला होता. यादरम्यान त्याला गुडघ्याची दुखापत झाली, ज्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यामुळे तो पाच महिन्यांसाठी क्रिकेटमधून बाहेर झाला होता. त्याला ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेतही खेळता आले नव्हते.
विशेष म्हणजे, जडेजाला बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील करण्यात आले होते. मात्र, त्याचा फिटनेस चांगला नसल्यामुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले होते. अशात आता 34 वर्षीय जडेजाने तमिळनाडूविरुद्ध सौराष्ट्र संघासाठी रणजी ट्रॉफी सामना खेळला. यामध्ये त्याने 41.1 षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने दोन्ही डावात 40 धावाही केल्या होत्या. यावरून तो कसोटी सामना खेळण्यासाठी फिट असल्याचे स्पष्ट झाले.
श्रेयस अय्यरच्या फिटनेसवर एनसीएचे लक्ष
रवींद्र जडेजा याच्या पुनरागमनाने नागपूर कसोटीत भारतीय संघाची ताकद आणखी मजबूत झाली आहे. कारण, त्याची गोलंदाजी आणि फलंदाजी कसोटी साामन्यात महत्त्वाची असेल. मात्र, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाहीये. कारण, त्याला फिटनेस चाचणी पास झाल्याचे घोषित करण्यात आले नाहीये. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याला अजूनही उपचाराची गरज आहे. अय्यरला पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. (all rounder ravindra jadeja has passed the fitness test in nca and set to join test squad in nagpur)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात एकटा गिल सर्वांना पुरून उरला; 6 डावात ठोकल्या 500पेक्षा जास्त धावा, बाकीचे…
कमबॅक करताच आर्चरचा दक्षिण आफ्रिकेत धमाका; कामगिरी अशी की, मुंबई इंडियन्सही होईल खुश




