भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा दीर्घ काळापासून संघाबाहेर होता. त्याला दुखापतीमुळे मोठ्या मालिका आणि स्पर्धांमध्ये भाग घेता आला नव्हता. मात्र, त्याने आता मैदानावर पुनरागमन केले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वीच जडेजा देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीत उतरला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर जडेजाला त्याचा फिटनेस कायम राखण्यासाठी हा सामना खेळणे गरजेचे आहे. इतकेच नाही, तर अनेक क्रिकेट दिग्गजांनीही जडेजाकडे मागणी केली होती की, त्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी कमीत कमी एक रणजी सामना तरी नक्कीच खेळला पाहिजे.
मंगळवारपासून (दि. 24 जानेवारी) रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र आणि तमिळनाडू (Saurashtra And Tamilnadu) संघात सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अष्टपैलूव्यतिरिक्त आणखी एका नवीन भूमिकेत उतरणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, जडेजा या सामन्यात त्याच्या घरगुती सौराष्ट्र (Saurashtra) संघाचे नेतृत्व करेल. त्याच्याकडे वर्षाच्या सुरुवातीलाच रणजी सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही बातमी स्पोर्ट्स स्टार या न्यूज वेबसाईटने दिली आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने मागील काही दिवसांपूर्वीच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. यामध्ये रवींद्र जडेजाच्या नावाचाही समावेश होता. बोर्डाने जडेजाच्या फिटनेसला त्याच्या खेळण्याचा आधार म्हटले होते. म्हणजेच जडेजाला कसोटी खेळण्यापूर्वी त्याचा फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.
जडेजाकडे आहे कर्णधारपदाचा अनुभव
जडेजाकडे आधीपासूनच कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने आयपीएल 2022मधील काही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, तो टी20 क्रिकेटमधील अधिक दबावामुळे नेतृत्वाच्या बाबतीत अपेक्षेनुसार यशस्वी ठरला नाही. कर्णधार बनल्यानंतर त्याच्या कामगिरीचा आलेखही घसरला होता. त्यामुळे त्याला स्वत:च नेतृत्व सोडावे लागले होते. मात्र, रणजी ट्रॉफीसारख्या कसोटी क्रिकेट प्रकारात त्याच्याकडून संघाला चांगल्या नेतृत्वाची अपेक्षा असेल. (team india all rounder ravindra jadeja will captaining saurashtra team in ranji trophy match against tamilnadu)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शमी आहे कोट्यवधी किंमतीच्या स्पोर्ट्स कारचा मालक; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘स्पीड मॅटर करते’
‘क्रिकेट कोणताही सामान्य खेळ नाहीये…’, भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूंवर भडकले कपिल देव