भारतीय संघ एकीकडे द्विपक्षीय मालिकांमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे, परंतु दुसरीकडे भारताचे अनेक गोलंदाज आणि फलंदाज दुखापतीने ग्रस्त आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या स्पर्धा आणि मालिकांमध्ये त्यांना संघात स्थान मिळवता येत नाहीये. त्याचा फटका भारतीय संघाला बसत आहे. मागील वर्षी अष्टपैलू हार्दिक पंड्या याने दीर्घ काळानंतर पुनरागमन केले. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे मागील वर्षापासूनच दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहेत. खेळाडूंच्या दुखापतींविषयी विचारले असता, भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले कपिल देव?
माध्यमांशी बोलताना कपिल देव (Kapil Dev) यांनी स्वीकार केले की, जास्त क्रिकेट खेळले जात असल्यामुळे खेळाडूंना दुखापती होण्याची शक्यता अधिक असते. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट, देशांतर्गत किंवा टी20 लीगचाही समावेश आहे. याचा संदर्भ देत ते म्हणाले की, “आता क्रिकेटचा हंगाम 10 महिन्यांहून अधिकचा झाला आहे. तुम्ही जितके सामने खेळणार, तेवढ्या जास्त दुखापती होतील. क्रिकेट कोणताही सामान्य खेळ नाहीये. तुम्हाला ऍथलिट व्हावे लागेल. सर्व मांसपेशींचा वापर करावा लागेल. प्रत्येक गोष्ट अंगीकारणे इतके सोपे नाहीये. हे शरीरावर भारी पडते आणि त्यामुळेच दुखापती होतात.”
दुखापतग्रस्त गोलंदाजांच्या सरावावर तिखट प्रतिक्रिया
भारताच्या दुखापतग्रस्त गोलंदाजांच्या सरावावरही तिखट प्रतिक्रिया देत कपिल देव म्हणाले की, “तुम्ही नेटमध्ये जितकी गोलंदाजी कराल, तुमच्या मांसपेशी तितक्या अधिक विकसित होऊ लागतील. आज मला सांगण्यात आले आहे की, वेगवान गोलंदाजांना केवळ 30 चेंडू टाकण्याची परवानगी आहे. हेच एक मोठे कारण आहे, व्यावसायिक असल्यामुळे आपल्या खेळाचा इतका ताण घेतात.”
दुखापतीमुळे मोठ्या स्पर्धेला मुकले
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे टी20 विश्वचषकातून बाहेर झाले होते. त्यानंतर त्यांनी कोणतेही क्रिकेट खेळले नाहीये. या दोघांच्या पुनरागमनावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. जडेजाला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर- गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी संघात निवडले गेले आहे. मात्र, त्यापूर्वी त्याला त्याची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. त्यासाठी आता जडेजा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. (former india captain kapil dev blunt reply on recent spree of injuries that have hurt india the most)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ लवकर बरा होण्यासाठी सूर्यकुमारने बाबा महाकालकडे केली प्रार्थना, म्हणाला, ‘आमच्यासाठी पंत…’
लगीनघाई! राहुल अन् अथियाच्या संगीत सेरेमनीचा व्हिडिओ व्हायरल; खंडाळ्यात किती वाजता घेणार सात फेरे?