भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार प्रदर्शन केले. या सामन्यातील कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. शमी त्याच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही जास्त चर्चेत असतो. शमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. अशातच आता शमीने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या महागड्या गाडीसोबत दिसत आहे.
शमीची पोस्ट
मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने मागील वर्षी जुलै महिन्यात जग्वार (Jaguar) कंपनीची एफ-टाईप स्पोर्ट्स कार खरेदी केली होती. या गाडीची किंमत ही जवळपास 1 कोटी रुपये आहे. शमीने याच गाडीसोबतचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला दिलेले कॅप्शनही तितकेच लक्षवेधी आहे. शमीने “स्पीड मॅटर करती है” अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. याचा अर्थ असा की, गतीचा फरक पडतो.
शमीने त्याच्या गाडीसोबत व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही त्याने त्याच्या स्पोर्ट्स कारसोबत व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे, शमीने रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या अपघातानंतर लोकांना आवाहन केले होते की, गाडी वेगाने चालवू नका.
शमीला तिसऱ्या वनडेत विश्रांती
खरं तर, दुसऱ्या वनडेत शमीच्या प्रदर्शनानंतर असे म्हटले जात आहे की, न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. यामागील कारण म्हणजे, पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणारी कसोटी मालिका होय.
दुसऱ्या वनडेनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने शमी आणि सिराज यांच्याविषयी संकेत दिले होते. तो म्हणाला होता की, त्यांना तिसऱ्या वनडेसाठी विश्रांती दिली जाईल, जेणेकरून ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकतील. कारण, कर्णधार रोहितला वाटते की, कसोटी मालिकेपूर्वी खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची भीती आहे.
विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मोहम्मद शमी याने फक्त 6 षटके गोलंदाजी केली होती. यादरम्यान त्याने फक्त 18 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. याविषयी बोलताना म्हटले होते की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी शमीला ताजेतवाने ठेवायचे आहे. तसेच, शमीच्या जागी तिसऱ्या वनडेत युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला संधी मिळू शकते. (team india pacer mohammed shami new sports car jaguar see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘क्रिकेट कोणताही सामान्य खेळ नाहीये…’, भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूंवर भडकले कपिल देव
रिषभ लवकर बरा होण्यासाठी सूर्यकुमारने बाबा महाकालकडे केली प्रार्थना, म्हणाला, ‘आमच्यासाठी पंत…’