बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी शेवटच्या टप्प्यात आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या संपूर्ण मालिकेत नंबर एक कसोटी अष्टपैलू असलेल्या रवींद्र जडेजा याने ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजीची पिसे काढली आहेत. त्याने या संपूर्ण मालिकेत 20हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, तरीही तो एका मोठ्या पुरस्काराला मुकला आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून कसोटी क्रिकेटमध्ये एका युवा खेळाडूचे नाव चांगलेच चर्चेत आहे. या युवा खेळाडूने आपल्या वादळी फलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने मागील काही कसोटी सामन्यांमध्ये अशा काही धावा चोपल्या आहे, ज्यामुळे त्याला आयसीसीकडून खास भेट मिळाली आहे. मात्र, जडेजा या बाबतीत मागे पडला आहे.
आयसीसीकडून खास भेट मिळालेला खेळाडू इतर कुणी नसून इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रूक (Harry Brook) आहे. ब्रूकला आयसीसीकडून फेब्रुवारी 2023साठी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ (ICC Player of The Month) म्हणून निवडले गेले आहे. खरं तर, आयसीसीने ब्रूकसोबत भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वेस्ट इंडिजचा फिरकीपटू गुदाकीश मोटी (Gudakesh Motie) यांना या पुरस्कारासाठी नामांकित केले होते. मात्र, शेवटी ब्रूकने हा पुरस्कार पटकावला. 24 वर्षीय ब्रूकने या महिन्यात दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. यापूर्वी त्याने डिसेंबर 2022मध्येही ब्रूक याला पुरस्कार मिळाला आहे.
A rising talent has been voted as the ICC Men’s Player of the Month for February 2023 🌟
More 👇
— ICC (@ICC) March 13, 2023
ब्रूकची प्रतिक्रिया
आयसीसीकडून हा पुरस्कार मिळाल्यानंतर ब्रूक म्हणाला की, “हा पुरस्कार दुसऱ्यांदा जिंकणे, हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी माझ्या संघसहकारी आणि इंग्लंड संघ व्यवस्थापनाला धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी नेहमीच मला पाठिंबा दिला आहे. तसेच, माझ्या क्षमतेनुसार खेळण्यासाठी मला नेहमीच प्रोत्साहित केले आहे. माझ्यासाठी यावर्षाची सुरुवात चांगली राहिली आणि मला आशा आहे की, मी पुढेदेखील अशीच कामगिरी करत राहील. मला हीदेखील आशा आहे की, आगामी ऍशेस आणि भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्येही जागा बनवेल. तसेच, माझी ही कामगिरी सुरू ठेवेल.”
Harry Brook won the ICC men's Player Of The Month Award for February.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 13, 2023
ब्रूकने न्यूझीलंडमध्येही दाखवलेला जलवा
हॅरी ब्रूक याने या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध माऊंट माऊंगनुई येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात 81 चेंडूत 89 धावा चोपल्या होत्या. तसेच, दुसऱ्या डावात 41 चेंडूत 54 धावा खेळून इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यासाठी त्याला सामनावीर या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
Happy Harry Brook 😄
The England youngster after receiving the ICC Men's Player of the Month award for December 2022 🏆
📸 @englandcricket pic.twitter.com/5XBDRNgUNE
— ICC (@ICC) January 24, 2023
यानंतर वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने 21 धावांवर 3 विकेट्स गमावल्यानंतर इंग्लंडचा डाव सावरला होता. त्याने 176 चेंडूत 186 धावांची विस्फोटक खेळी साकारली होती. त्याने जो रूट याच्यासोबत 302 धावांची भागीदारी रचली होती. मात्र, या सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. असे असले, तरीही या मालिकेसाठी ब्रूकला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (all rounder ravindra jadeja missed harry brook named icc player of the month for february 2023 twice in career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | केन विलियम्सन ठरला हिरो! शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयी, भारत WTCच्या फायनलमध्ये
भारत खेळणार WTC फायनल, अहमदाबाद कसोटीचा निकाल लागण्याआधीच अंतिम सामन्यात धडक