न्यूझीलंड अ संघ येत्या सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत अ आणि न्यूझीलंड अ या संघांमध्ये ३ चार दिवसीय सामने आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळली जाईल. उभय संघातील या मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप घोषित झाला नाहीये, पण याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणारा अष्टपैलू शम्स मुलानी याला न्यूझीलंड अ संघाविरुद्ध भारतीय संघात निवडले जाणाऱ्या दाट शक्यता वर्तवली जात आहे. चाहते त्याची तुलना युवारज सिंगशी करत आहेत.
भारत दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंड अ संघाविरुद्ध चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेत शम्स मुलानी (Shams Mulani) भारतासाठी खेळताना दिसू शकतो. भारतीय संघाला आतापर्यंत आयपीएल मधून अनेक दिग्गज खेळाडू मिळाले आहेत. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुफानी प्रदर्शन करणारा शम्स मुलानी देखील लवकरच भारतासाठी खेळताना दिसू शकतो. आयपीएलमध्ये तो अद्याप खेळला नाहीये, पण मुंबईच्या रणजी संघासाठी त्याचे प्रदर्शन कौतुकास पात्र राहिले आहे.
मागच्या मोठ्या काळापासून मुलानी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करत आला आहे, पण रणजी ट्रॉफी २०२२ मध्ये त्याची खास चर्चा झाली. यावर्षी मुंबईसाठी सरफराज खान याने चमकदार कामगिरी केली, तर दुसरीकडे शम्स मुलानीचे प्रदर्शन देखील जबरदस्त राहिले. त्याने रणजी ट्रॉफीच्या या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्या. हंगामात खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये त्याने एकूण ४५ विकेट्स घेतल्या. यामध्ये ६ वेळा त्याने ५ विकेट्सचा हॉल घेतला, तर दोन सामन्यांमध्ये प्रत्येकी १०-१० विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त फलंदाजीत देखील त्याने मोलाचे योगदान दिले. हंगामातील ९ डावांमध्ये मुलानीने ४० च्या सरासरीने ३२१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ५ अर्धशतके ठोकली.
मुंबई संघ यावर्षी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता, पण त्यांना ट्रॉफी जिंकता आली नाही. असे असले तरी, शम्स मुलानीच्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर मुंबईने २०२२ सीके नायडु ट्रॉफी मात्र जिंकली. ही भारतातील २५ वर्षांखालील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे. यामध्ये मुलानीने खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये तब्बल ३२ विकेट्स घेतल्या. स्पर्धेतील ५ डावांमध्ये त्याने ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजी करताना १८९ धावांचे योगदान दिले.
दरम्यान, श्मस मुलानीची तुलना नेहीमीच भारताचा माजी दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh) सोबत केली जाते. युवराजने देखील भारतीय संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. शम्स मुलानी भविष्यात भारतीय संघातील युवाराजची कमी भरून काढेल, असे अनेकांना वाटते. युवराज आणि मुलानी यांची गोलंदाजीची पद्धत देखील एकसारखी आहे. दोघेही स्लो आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करतात. तसेंच फलंदाजीमध्येही मुलानीमध्ये युवराजप्रमाणे मोठे शॉट्स खेळण्याची पात्रता आहे. भारत अ संघात जर त्याला संधी मिळाली, तर भविष्यात तो भारतीय संघात स्थान बनवण्यासाठी दावेदार असेल.
चार दिवसीय सामन्यासाठी संभाव्य भारत अ संघ:
शुबमन गिल (कर्णधार), यश दुबे, हनुमा विहारी, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, केएस भरत (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, जलज सक्सेना, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, शुभम शर्मा, अक्षय वाडकर (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, मणिशंकर मुरासिंग
एकदिवसीय सामन्यासाठी संभाव्य भारत अ संघ:
शुभमन गिल (कर्णधार), पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, हनुमा विहारी, इशान किशन (यष्टीरक्षक), ऋषी धवन, वॉशिंग्टन सुंदर, प्रवीण दुबे, मयंक मार्कंडे, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, केएस भरत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, पुलकित नारंग, राहुल चहर आणि यश दयाल
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा ‘डबलवार’, झिम्बाब्वेला हरवत पाकिस्तानच्या ३२ वर्षे जुन्या विश्वविक्रमाला तडा