भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. गेली अनेक वर्ष भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला होता. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. नुकतीच त्याने सर्वकालीन ११ खेळाडूंची निवड केली.
आपल्या सर्वकालीन ११ खेळाडूंच्या यादीत हरभजन सिंगने भारतीय खेळाडूंना अधिक प्राधान्य दिले आहे. सर्वात जास्त विश्वास त्याने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीवर दाखवला आहे. तसेच त्याने एकूण ४ भारतीय खेळाडूंची निवड केली आहे. (All time eleven of harbhajan singh)
व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव।
हरभजन सिंगने रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर या दोन्ही खेळाडूंची सलामीवीर फलंदाज म्हणून निवड केली आहे. तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची त्याने ३ क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवड केली आहे. यादरम्यान आश्चर्याची बाब म्हणजे त्याने वीरेंद्र सेहवाग( virender sehwag) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) या दोन्ही दिग्गज खेळाडूंचा आपल्या सर्वकालीन ११ खेळाडूंच्या यादीत समावेश केला नाहीये.
काही दिवसांपूर्वी हरभजन सिंगने उल्लेख करत म्हटले होते की, सौरव गांगुली हा सर्वोत्तम कर्णधार आहे. तरीदेखील त्याने सौरव गांगुलीला या संघात स्थान दिले नाहीये. त्याने या संघाचे कर्णधारपद एमएस धोनीकडे सोपवले आहे. तर २ अष्टपैलू खेळाडू म्हणून जॅक कॅलिस आणि अँड्र्यू फ्लिंटॉपचा समावेश आहे.
तसेच वेगवान गोलंदाज म्हणून या संघात लसिथ मलिंगा आणि वसीम अक्रम (Wasim Akram) यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फिरकी गोलंदाज म्हणून त्याने शेन वॉर्न (Shane Warne) आणि मुथय्या मुरलीधरन यांना स्थान दिले आहे.
असा आहे हरभजन सिंगने निवडलेला सर्वकालीन ११ खेळाडूंचा संघ :
सचिन तेंडुलकर (भारत), रोहित शर्मा (भारत), विराट कोहली (भारत), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया), जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका), अँड्र्यू फ्लिंटॉफ( इंग्लंड) , एमएस धोनी (यष्टिरक्षक आणि कर्णधार, भारत), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), लसिथ मलिंगा (श्रीलंका) , वसीम अक्रम (पाकिस्तान), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका).
महत्वाच्या बातम्या :
क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड तरसतायेत एका कसोटी मालिका विजयासाठी! नजीकची कामगिरी लाज आणणारी
विराटच्या राजीनाम्यानंतर तापले राजकारण! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा जय शहांना टोला
हे नक्की पाहा: