दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज ॲलन डोनाल्ड यांनी अशा दोन भारतीय क्रिकेटपटूंबद्दल सांगितलं आहे, ज्यांना ते जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडू मानतात. डोनाल्ड यांनी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोघांना जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाज आणि गोलंदाज म्हटलं. त्यांना दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या देशांतर्गत टी20 लीगमध्ये (SA 20) या दोघांना खेळताना पाहायचे आहे.
दक्षिण आफ्रिका लीगमध्ये कोणत्या दोन भारतीय खेळाडूंचा समावेश करावयाचा आहे? असे विचारण्यात आल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “अरे देवा, मी कुठून सुरुवात करू? जर मला या लीगमध्ये भारतीय खेळाडूला खेळताना पाहायचे असेल तर तो विराट कोहलीच असेल. गोलंदाजासाठी मी जसप्रीत बुमराहची निवड करेन. कारण ते दोघे जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडू असून त्यांना जगभरात खूप प्रसिद्धी आहे.”
ॲलन डोनाल्ड पुढे म्हणाले की, “नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत विराट कोहलीची कामगिरी खराब राहिली. त्याने केवळ 190 धावा केल्या. त्याच्या खराब फॉर्मची बरीच चर्चा झाली आहे. विराटने आता निवृत्ती घ्यावी, अशी मागणी चाहत्यांकडून होताना दिसते. आता विराटचे भविष्य काय असणार हे मला पहायचे आहे.” जसप्रीत बुमराहच्या कामगिरी बाबत बोलताना ते म्हणाले की, “बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीत त्याची कामगिरी शानदार राहिली. त्याने 32 विकेट्स घेत ‘प्लेयर ऑफ द सिरिज’चा पुरस्कार मिळवला. बुमराह ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.
दक्षिण आफ्रिका लीग 2025 चा नवा हंगाम 9 जानेवारी (गुरुवार) पासून सुरु होत आहे. या लीगचा हा तिसरा हंगाम 9 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. भारतात या लीगचे प्रसारण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर करण्यात येईल. तसेचही लीग जिओ सिनेमावर देखील पाहता येणार आहे.
हेही वाचा –
भारतीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल! निवड समितीला कठोर निर्णय घेण्याचा सल्ला
“भांडतो विराट कोहली, पण संपूर्ण टीमला भोगावं लागतंय…”, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
2024 सालचा सर्वोत्तम कसोटी संघ, 3 भारतीय आणि एका पाकिस्तानी खेळाडूचा समावेश