भारतीय हॉकी संघाचा खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेता वरुण कुमार अडचणीत आला आहे. 22 वर्षीय मुलीने त्याच्यावर लैंगिक शोषण आणि फसवणूकीचे आरोप केले आहेत. पॉस्को कायद्याअंतर्गत हॉकीपटूवर गुन्हा नोंदवला गेला आहे. पीडित तरुणीने असा आरोप केला आहे की, ती अल्पवयीन असताना वरुणने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला आहे.
पीडित तरुणी सध्या 22 वर्षांची आहे. सोमवारी (4 फेब्रुवारी) तिने पोलिसात तक्रार दाखल केली की, भारतीय हॉकीपटू वरुण कुमार (Varun Kumar) मागच्या 5 वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत आला आहे. 2018 पीडित 17 वर्षांची होती. वरुणने त्यावेळी तिला लग्नाचे स्वप्न दाखवून पीडितेचा फायदा उचलला, असा आरोप त्याच्यावर आहे. त्यावेळी वरुण भारतीय खेळ प्राधिकरण (SAI) याठिकाणी सरवा करत होता. 2018 मध्ये त्याने इंस्टाग्रामवर पीडित तरुणीची संपर्क साधला होता. आता फेब्रुवारी 2024 मध्ये त्याच्याविरोधात बेंगलोरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्याला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी डीएसपी पदाचे नियुक्तीपत्र देखील मिळाले होते.
माहितीनुसार जुलै 2019 मध्ये वरुणने बोलण्यासाठी सांगून पीडितेला बेंगलोरमधील जयनगर स्थित एका हॉटेलमध्ये बोलावले. त्याला यावेळी पूर्ण कल्पना होती की, पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. पण तरीदेखील त्याने तिच्याशी शारीरिक संबंध बनवले. पीडितने त्यावेळी शारीरिक संबंध बनवण्यासाठी विरोध देखील केला होता. पण हॉकीपटूने लग्नासाठी शब्द दिला आणि संबंध बनवले. एफआयआरमध्ये सांगितल्याप्रमाणे वरुण लग्नाचे आमिष दाखवून पाच वर्षी या पीडित तरुणीचा फायदा घेत राहिला.
पाच वर्षी पीडितेशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर नंतर स्वतः या तिच्यापासून दूर राहू लागला. तसेच लग्नासाठी त्याने नकार देखील कळवला. त्याने अशी धमकी देखील दिली की, लग्नासाठी दबाव आणला, तर तो सोशल मीडियावर दोघांचे प्रायव्हेट फोटो अपलोड करेल. मंगळवारी (5 फेब्रुवारी) पोलिसांनी अशी माहिती दिली की, “महिलेच्या तक्रारीनंतर आम्ही हॉकीपटूवर पॉस्को आणि संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.”
दरम्यान, वरुण कुमारच्या हॉकी कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. 2017 मध्ये त्याने भारतीय हॉकी संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 2020 साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघआने रौप्य पदक जिंकले होते. हिमाचल प्रदेश सरकारने वरुणला एक कोटी रुपयांचे बक्षीस देखील दिले होते. 2022 मध्ये बर्मिंघममध्ये कॉमनवेल्थ गेम्स पार पडल्या. या स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघात वरुण देखील होता. वरुण सध्या भुवनेश्वरमध्ये सराव करत असल्याची माहिती हॉकी इंडियाकडून मिळाली आहे. (Allegations of sexual abuse against Indian hockey player Varun Kumar)
महत्वाच्या बातम्या –
एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत चार मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत हॉकीमध्ये लॉयला हायस्कुल संघाला विजेतेपद