मुंबई, ६ फेब्रुवारी: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताची दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू सहजा यमलापल्ली हीने जागतिक क्रमवारीत अव्वल १०० खेळाडूंमध्ये असलेल्या अमेरिकेच्या कायला डे हिचा पराभव करून सनसनाटी विजयाची नोंद केली. २३ वर्षीय सहजा पहिल्यांदाच डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धा खेळत आहे.
आपल्या पहिल्या फेरीतील सनसनाटी विजयानंतर सहजा हिने स्पर्धा आयोजकांचे वाईल्ड कार्ड प्रवेशासाठी आभार मानले. यावेळी सहजा म्हणाली की, मी या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला. अशा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मला संधी दिल्यामुळे मी एमएसएलटीए व सुंदर अय्यर सर यांचे विशेष करून आभार मानते. या सर्व मानांकित खेळाडूंमध्ये वावरताना नक्कीच आपण काही करू शकतो अशी भावना निर्माण होते. या खेळाडूंशी दोनहात करताना आपल्यामध्ये देखील आत्मविश्वास निर्माण होतो. जरी ती या स्पर्धेतील अव्वल खेळाडू असली तरी उत्कृष्ट खेळ करू शकते, हे सामन्याआधी मी स्वतःला सांगितले. अव्वल १०० खेळाडूंमध्ये असलेल्या खेळाडूंशी मी याआधी कधीही खेळले नव्हते. पण मी सामन्यात माझा सर्वोत्तम खेळ करू शकले आणि मानांकित खेळाडूवर मला विजय मिळवता आला त्यामुळे मी खूप खुश आहे.
माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर माझ्यासाठी हा खूप मोठा विजय आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असून अधिक परिश्रम, सराव करून उच्च स्तरावर माझी कामगिरी आणखी उंचावेल, असे सहजा हिने सांगितले.
मी ही कामगिरी करू शकले, याचे मला आश्चर्य वाटत नाही. कारण या दर्जाचा खेळ मी करू शकते हे मला माहीतच होते. हा सारा मानसिक प्रवास आहे. यापूर्वीहि अव्वल २०० मानांकन असलेल्या खेळाडूंशी मी स्पर्धा केली, तेव्हा मी त्याच स्तरावर होते. मात्र त्यावेळी विजयाच्या जवळ येऊनही मला जिंकता येत नव्हते. कारण माझा आत्मविश्वास कमी पडत होता. यावेळी मात्र, तो सारा अनुभव माझ्या पाठीशी आहे. इतकंच नव्हे तर या खेळाडूंविरुद्ध मी नक्कीच विजय मिळवू शकते, असा मला विश्वास वाटतो आणि त्यामुळेच मी हि मजल मारू शकले आहे.
मानांकन हा केवळ आकडा असतो असे मला वाटत नाही. पण अर्थातच मी मानांकन राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच माझ्या खेळात सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला टेनिसमध्ये शिकण्यासारखे आणि खेळाडमध्ये सुधारणा करण्यासारखे आणखी खूप काहीच आहे त्यामुळे आजच्या विजयातून मी केवळ पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा आणि आत्मविश्वास घेऊन जात आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये पात्रता फेरीत केहलने हे यावर्षीचे माझे लक्ष्य असून त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची माझी तयारी आहे.
महत्वाच्या बातम्या –
एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत चार मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
दक्षिण आशियातील पहिली-वहिली महिला हँडबॉल लीग भारतात होणार, आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्टार खेळणार