नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी २०२४ : मैलाचा दगड म्हणून ओळखली जाणारी दक्षिण आशियातील पहिल्या-वहिल्या व्यावसायिक महिला हँडबॉल लीग (WHL) चे आयोजन भारतात होणार आहे. या लीगमध्ये मध्य पूर्व, दक्षिण पूर्व, युरोप आणि आफ्रिकेतील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. दक्षिण आशियाई हँडबॉल फेडरेशन, आशियाई हँडबॉल फेडरेशन आणि हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणाऱ्या या लीगचा प्रचार अधिकृत परवानाधारक पवना स्पोर्ट्स व्हेंचरद्वारे केला जाणार आहे.
उद्घाटनीय आवृत्तीत सहा संघ सहभागी होणार आहेत. या लीगच्या माध्यमातून भारतीय महिला खेळाडूंना त्यांचे कौशल्या दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे आणि शिवाय या खेळातील चॅम्पियन्सचा भविष्याच्या दिशेने एक नवा प्रवास सुरू होणार आहे. ही लीग भारतातील महिला हँडबॉल खेळाडूंसाठी गेम चेंजर ठरणार आहे.
क्रांतिकारी लीगच्या घोषणेवर भाष्य करताना हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे लीग अध्यक्ष आणि दक्षिण आशियाई हँडबॉल फेडरेशनचे महासचिव श्री आनंदेश्वर पांडे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले, “भारतातील पहिली महिला हँडबॉल लीग सुरू करण्याच्या या ऐतिहासिक क्षणाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. देशभरात महिला हँडबॉल लीगचा प्रचार आणि विकास करण्याच्या आमच्या मोहिमेतील हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पवना स्पोर्ट्स व्हेंचर आणि आशियाई व आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत मिळून भारतातील महिला हँडबॉलचा दर्जा उंचावणे आणि आमच्या खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. ही लीग आपल्या देशासाठी महिला हँडबॉल तसेच महिला खेळांडूंसाठी एका नवीन युगाची सुरुवात करते.”
भारताच्या मुलींच्या हँडबॉल संघाने गेल्या वर्षी जॉर्डनमध्ये प्रथमच प्रतिष्ठित “आशियाई अध्यक्ष चषक” स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, तर भारतीय मुलींच्या ज्युनियर हँडबॉल संघाने आशियाई ज्युनियर मुलींच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आणि गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरले. २०२२च्या आशियाई स्पर्धेत भारतीय महिला हँडबॉल संघाने पाचवे स्थान पटकावले.
पायाभूत सुविधांचा विकास, प्रतिभा ओळखणे आणि तळागाळातील खेळासाठी उच्च दर्जाच्या कोचिंग सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी Pavna Sports Venture पुढील तीन वर्षांत १०० कोटींहून अधिक भरीव गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे.
“एक कॉर्पोरेट गट म्हणून, पवना स्पोर्ट्स व्हेंचर हे महिला क्रीडा सक्षमीकरणाचे एक भक्कम पुरस्कर्ते आहेत. ज्यांचा विश्वास आहे की खेळ हे एक साधन म्हणून एखाद्या व्यक्तीच्या अनेक पैलूंमध्ये वाढ करण्यास मदत करू शकते. महिला हँडबॉल लीगच्या संकल्पनेचा उद्देश केवळ महिला हँडबॉलपटूंमध्येच नाही तर संपूर्ण भारतातील महिलांना क्रीडा क्षेत्रात नाव कमावून देण्यासाठी एक ब्रिज तयार करणे, हा आहे. भारतातील महिला स्पोर्ट्स लीगमध्ये महिलांच्या हँडबॉल लीगला भरभराटीसाठी आणि प्रमुख स्थान मिळवून देणारी सर्वसमावेशक इकोसिस्टम स्थापित करणे, हे आमचे प्राथमिक ध्येय आहे. या लीगद्वारे, नवीन पिढीतील महिलांना आर्थिक, मानसिक आणि भावनिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. जानेवारी २०२५ पर्यंत लीग सुरू करण्याचे आमचे ध्येय आहे,” असे पवना इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आणि पवना स्पोर्ट्स व्हेंचरच्या अध्यक्षा श्रीमती प्रिया जैन यांनी सांगितले.
हँडबॉल हा सर्वात वेगवान ऑलिम्पिक खेळ म्हणून ओळखला जातो जेथे प्रत्येकी सात खेळाडूंचा समावेश असलेले दोन संघ एक चेंडू त्यांच्या हातांनी पास करतात आणि तो विरोधी संघाच्या गोलमध्ये फेकण्याचे लक्ष्य ठेवतात. एक सामना प्रत्येकी ३० मिनिटांच्या दोन कालावधीत विभागला जातो आणि सामन्याच्या शेवटी अधिक गोल करणारा संघ विजेता म्हणून घोषित केला जातो.
भारतात ३ लाखांहून अधिक मुली आणि महिला विविध स्तरांवर हँडबॉल खेळत आहेत आणि हा खेळ भारतात वाढत आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, CISF, CRPF, रेल्वे, सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ (सैन्य, नौदल, वायुसेना), भारतीय क्रीडा प्राधिकरण, क्रीडा संवर्धन मंडळ आदी संघाचे प्रतिनिधित्व त्या करत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत हॉकीमध्ये लॉयला हायस्कुल संघाला विजेतेपद
‘माझी वाट लागली’, लाईव्ह सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार असा का म्हणाला? VIDEO व्हायरल