सरबियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याने रविवारी (29 जानेवारी) ऑस्ट्रेलिया ऑपन 2023 चे विजेतेपद पटकावले. जोकोविचच्या टेनिस कारकिर्दीतील हे 10 वे ऑस्ट्रेलिया ओपन विजेतेपद असून 22 ग्रँड स्लॅम नावावर केले आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेत्यांच्या यादीत आता जोकोविच आणि राफेल नदाल 22 ग्रँड स्लॅम्ससह संक्युक्तरित्या पहिल्या क्रमांकावर क्रमांकावर पोहोचला. अंतिम सामन्यात सर्बियाच्या जोकोविचने ग्रिकच्या स्टिफानोस त्सित्सिपास याला मात दिली. जोकोविचने हा सामना 6-3, 7-4, 7-6 अशा फरकाने जिंकला.
ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये 2019 पासून नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने पराभव स्वीकारला नाहीये. मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये जोकोविचने ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना व्हायरल सर्वत्र थैमान घालत असताना ऑस्ट्रेलिया ओपनसाठी कोरोनाप्रतिबंधक लस घेणे अवश्य होतो. पण जोकोविचने मात्र ही लग शेवटपर्यंत घेतली नाही आणि ऑस्ट्रेलिया ओपनसारख्या मोठ्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली. जोकोविचच्या अनुपस्थितीत मागच्या वर्षी राफेल नदाल (Rafael Nadal) याने कारकिर्दीतील 22 वे ग्रँड स्लॅम जिंकले आणि विश्वविक्रम रचला. जोकोविचने नदालचा हा विक्रम यावर्षी मोडत सर्वाधिक ग्रँडस्लॅम्सच्या बाबतीत त्याची बरोबरी केली.
ऑस्ट्रेलिया ऑपन जिंकणार खेळाडू –
2023 नोवाक जोकोविच (विजेता) – स्टिफानोस त्सित्सिपास (उपविजेता) –
2022 राफेल नदाल (विजेता) – डॅनिल मेदवेदेव (उपविजेता) : 2-6, 6-7(5), 6-4, 6-4, 7-5
2021 नोव्हाक जोकोविच (विजेता) – डॅनिल मेदवेदेव (उपविजेता) : 7-5, 6-2, 6-2
2020 नोव्हाक जोकोविच (विजेता) – डॉमिनिक थिएम (उपविजेता): 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4
2019 नोव्हाक जोकोविच (विजेता) – राफेल नदाल (उपविजेता) : 6-3, 6-2, 6-3
2018 रॉजर फेडरर (विजेता) – मारिन सिलिक (उपविजेता) :6-2, 6-7(5), 6-3, 3-6, 6-1
2017 रॉजर फेडरर (विजेता) – राफेल नदाल (उपविजेता) : 6-4, 3-6, 6-1, 3-6, 6-3
2016 नोव्हाक जोकोविच (विजेता) – अँडी मरे (उपविजेता) : 6-1, 7-5, 7-6(3)
2015 नोव्हाक जोकोविच (विजेता) – अँडी मरे (उपविजेता) : 7-6(5), 6-7(4), 6-3, 6-0
2014 स्टॅन वावरिंका (विजेता) – राफेल नदाल (उपविजेता) : 6-3, 6-2, 3-6, 6-3
2013 नोव्हाक जोकोविच (विजेता) – अँडी मरे (उपविजेता) : 6-7(2), 7-6(3), 6-3, 6-2
2012 नोव्हाक जोकोविच (विजेता) – राफेल नदाल (उपविजेता) : 5-7, 6-4, 6-2, 6-7(5), 7-5
2011 नोव्हाक जोकोविच (विजेता) – अँडी मरे (उपविजेता) : 6-4, 6-2, 6-3
2010 रॉजर फेडरर (विजेता) – अँडी मरे (उपविजेता) :6-3, 6-4, 7-6(11)
2009 राफेल नदाल (विजेता) – रॉजर फेडरर (उपविजेता) : 7-5, 3-6, 7-6(3), 3-6, 6-2
2008 नोव्हाक जोकोविच (विजेता) – जो-विल्फ्रेड सोंगा (उपविजेता) : 4-6, 6-4, 6-3, 7-6(2)
2007 रॉजर फेडरर (विजेता) – फर्नांडो गोन्झालेझ (उपविजेता) : 7-6(2), 6-4, 6-4
2006 रॉजर फेडरर (विजेता) – मार्कोस बगदाटिस (उपविजेता) : 5-7, 7-5, 6-0, 6-2
2005 मारात सफिन (विजेता) – लेटन हेविट (उपविजेता) : 1-6, 6-3, 6-4, 6-4
2004 रॉजर फेडरर (विजेता) – माराट साफिन (उपविजेता) : 7-6(3), 6-4, 6-2
2003 आंद्रे अगासी (विजेता) – रेनर शुएटलर (उपविजेता) : 6-2, 6-2, 6-1
2002 थॉमस जोहान्सन (विजेता) – मरात साफिन (उपविजेता) : 3-6, 6-4, 6-4, 7-6(4)
2001 आंद्रे अगासी (विजेता) – अरनॉड क्लेमेंट (उपविजेता) : 6-4, 6-2, 6-2
2000 आंद्रे आगासी (विजेता) – येवगेनी काफेल्निकोव्ह (उपविजेता) : 3-6, 6-3, 6-2, 6-4
1999 येवगेनी काफेल्निकोव्ह (विजेता) थॉमस एनक्विस्ट (उपविजेता) : 4-6, 6-0, 6-3, 7-6(1)
1998पेट्र कोर्डा (विजेता) – मार्सेलो रिओस (उपविजेता) : 6-2, 6-2, 6-2
1997 पीट सॅम्प्रास (विजेता) – कार्लोस मोया (उपविजेता) : 6-2, 6-3, 6-3,
1996 बोरिस बेकर (विजेता) – मायकेल चांग (उपविजेता) : 6-2, 6-4, 2-6, 6-2
1995 आंद्रे आगासी (विजेता) – पीट सॅम्प्रास (उपविजेता) : 4-6, 6-1, 7-6(6), 6-4
1994 पीट सॅम्प्रास (विजेता) – टॉड मार्टिन (उपविजेता) : 7-6(4), 6-4, 6-4
1993 जिम कुरियर (विजेता) – स्टीफन एडबर्ग (उपविजेता) : 6-2, 6-1, 2-6, 7-5
1992 जिम कुरियर (विजेता) – स्टीफन एडबर्ग (उपविजेता) : 6-3, 3-6, 6-4, 6-2
1991 बोरिस बेकर (विजेता) – इव्हान लेंडल (उपविजेता) : 1-6, 6-4, 6-4, 6-4
1990 इव्हान लेंडल (विजेता) – स्टीफन एडबर्ग (उपविजेता) : 4-6, 7-6(3), 5-2
1989 इव्हान लेंडल (विजेता) – मिलोस्लाव मेसीर (उपविजेता) : 6-2, 6-2, 6-2
1988 मॅट्स विलँडर (विजेता) – पॅट कॅश (उपविजेता) : 6-3, 6-7(3), 3-6, 6-1, 8-6
1987 स्टीफन एडबर्ग (विजेता) – पॅट कॅश (उपविजेता) : 6-3, 6-4, 3-6, 5-7, 6-3
1986 स्पर्धा नाही
1985 स्टीफन एडबर्ग (विजेता) – मॅट्स विलँडर (उपविजेता) : 6-4, 6-3, 6-3
1984 मॅट्स विलँडर (विजेता) – केविन करेन (उपविजेता) : 6-7(5), 6-4, 7-6(3), 6-2
1983 मॅट्स विलँडर (विजेता) – इव्हान लेंडल (उपविजेता) : 6-1, 6-4, 6-4
1982 जोहान क्रीक (विजेता) – स्टीव्ह डेंटन (उपविजेता) ) : 6-3, 6-3, 6-2
1981 जोहान क्रीक (विजेता) – स्टीव्ह डेंटन (उपविजेता) : 6-2, 7-6, 6-7, 6-4
1980 ब्रायन टीचर (विजेता) – किम वॉर्विक (उपविजेता) : 7-5, 7-6, 6-3
1979 गिलेर्मो विलास (विजेता) – जॉन साद्री (उपविजेता) : 7-6, 6-3, 6-2
1978 गिलेर्मो विलास (विजेता) – जॉन मार्क्स (उपविजेता) : 6-4, 6-4, 3-6, 6-3
1977 रोस्को टॅनर (विजेता) – गिलेर्मो विलास (उपविजेता) : 6-3, 6-3, 6-3
1977 विटास जेरुलाईटिस (विजेता) – जॉन लॉयड (उपविजेता) : 6-3, 7-6, 5-7, 3-6, 6-2
1976 मार्क एडमंडसन (विजेता) – जॉन न्यूकॉम्बे (उपविजेता) : 6-7, 6-3, 7-6, 6-1
1975 जॉन न्यूकॉम्ब (विजेता) – जिमी कॉनर्स(उपविजेता) : 7-5, 3-6, 6-4, 7-6
1974 जिमी कॉनर्स (विजेता) – फिल डेंट (उपविजेता) : 7-6, 6-4, 4-6, 6-3
1973 जॉन न्यूकॉम्बे (विजेता) – ओनी पारुन (उपविजेता) : 6-3, 6-7, 7-5, 6-1
1972 केन रोझवॉल (विजेता) – मल अँडरसन (उपविजेता) : 7-6, 6-3, 7-5
1971 केन रोझवॉल (विजेता) – आर्थर ऍशे (उपविजेता)) : 6-1, 7-5, 6-3
1970 आर्थर अॅशे (विजेता) – डिक क्रेली (उपविजेता) : 6-4, 9-7, 6-2
1969 रॉड लेव्हर (विजेता) – आंद्रेस गिमेनो (उपविजेता) : 6-3, 6-4, 7-5
1968 बिल बोवरी (विजेता) – जुआन गिस्बर्ट (उपविजेता) : 7-5, 2-6, 9-7, 6-4
(Along with Novak Djokovic, these tennis players have won the Australian Open)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी खाल्लं असतं, तर त्याला उपाशी राहावे लागलं असतं’, वडिलांची हळहळ ऐकून कॅप्टन बाबरही रडला ढसाढसा
अश्विनचा रोहितच्या टीम इंडियाला पाठिंबा! म्हणाला, ‘सचिनलाही चॅम्पियन बनण्यासाठी 6 वर्ल्डकप खेळावे लागलेले’