आयपीएलच्या १३ व्या हंगामातील चौदावा सामना शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. नाणेफेक जिंकत हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. त्यांचे पहिले २ विकेट्स जॉनी बेयरस्टो आणि मनीष पांडेच्या रूपात ५० धावांच्या आतच पडले. त्यानंतर कर्णधार वॉर्नरही २८ धावा करत तिसऱ्या विकेटच्या रूपात चेन्नईचा फिरकीपटू पीयुष चावला टाकत असलेल्या ११ व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसकडून झेलबाद झाला.
वॉर्नर बाद झाल्यानंतर मागील सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा खेळाडू केन विलियम्सन फलंदाजीला आला. संघाला त्याच्याकडून अपेक्षा होत्या. परंतु वॉर्नरला बाद करणाऱ्या चावलाच्या गोलंदाजीवर तोही धावबाद झाला. त्यानंतर विलियम्सन धावबाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
झाले असे की, चावलाने टाकलेला चेंडू विलियम्सनने मिड विकेटच्या दिशेने चेंडू फटकावला आणि झटकन धाव घेण्यासाठी धावला. परंतु तो फटका धाव घेण्यासारखा नव्हता. विलियम्सन खेळपट्टीच्या मध्ये गेल्यानंतर रायडूने चेंडू ताबडतोब धोनीच्या दिशेने फेकला. धोनीने क्षणभरही वाट न पाहता बेल्स उडवल्या आणि विलियम्सनला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे केवळ ९ धावा करत विलियम्सनला समाधान मानावे लागले.
https://twitter.com/ipl2020highlite/status/1312050574880247809
https://twitter.com/RSanthoshni/status/1312060078606839808
➡️ Today's #MSDhoni #StarMoment
Amazing Run Out by MS Dhoni, Kane Williamson is Out.
Match – SRH vs CSK
Over: 10. 6
Score: 69 – 4#TVSStaRcityplus #MSDhoni #StarMoment
@TVSStarCityPlus pic.twitter.com/kYKtsbwIMm— Himanshu Bhardwaj (@HimanshuB71) October 2, 2020
Never seen Kane Williamson so angry in cricket field. pic.twitter.com/TNMRo77vOm
— Johns. (@CricCrazyJohns) October 2, 2020
Pic 1: Kane Williamson Smiling even After losing WC final 2019
Pic 2: Kane Williamson after getting run out in an IPL inning.
IPL > WC.#IPL2020 pic.twitter.com/CbozB7vacY
— Captain (@iEatCricket) October 2, 2020
https://twitter.com/DHONIism/status/1312046215505166336
https://twitter.com/desi_Shinchan_/status/1312053878104317952
So much Coolness in single frame !!
Dhoni ki stumping and Kane Williamson ka Run out 💔💔#CSKvSRH #KaneWilliamson #MSDhoni #SRHvsCSK pic.twitter.com/iSwjBE4Tee
— Archie Agarwal 🦋❤️🌪️💫🌈🥺 (@_rchie0425) October 2, 2020
पुढे युवा खेळाडू प्रियम गर्गने चमकदार कामगिरी करत २३ चेंडूत ५० धावा करत आपले आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे हैदराबाद संघाच्या धावसंख्येत भर पडली. हैदराबाद संघाने १६४ धावा केल्या आणि चेन्नईला १६५ धावांचे आव्हान दिले.