भारताचा फलंदाज अंबाती रायडूने दोन महिन्यांपूर्वी 3 जूलैला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण काही दिवसांपूर्वी त्याने पुनर्विचार करत निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे आता त्याच्याकडे या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी हैद्राबाद संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
2019 विश्वचषक सुरु होण्याआधी भारतीय संघात चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार म्हणून रायडूकडे पाहिले जात होते. मात्र इंग्लंड आणि वेल्स येथे जून-जूलैमध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषकात रायडूला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती.
तसेच हा विश्वचषक सुरु असताना भारताचे शिखर धवन आणि विजय शंकर हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्यानंतरही राखीव खेळाडू असलेल्या अंबाती रायडूला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. त्यानंतर अंबाती रायडूने निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेतला होता.
पण त्यानंतर त्याने निवृ्त्तीच्या निर्णयावर पुन्हा विचार करत ऑगस्टच्या अखेरीस निवृत्ती मागे घेतली. निवृत्ती मागे घेण्यासाठी त्याला हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनच्या निवड समीतीचे प्रमुख नोएल डेव्हिड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी मदत केली.
त्याने निवृत्ती मागे घेत असल्याचा इमेल हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनला लिहिला होता. यामध्येही त्याने डेव्हिड आणि लक्ष्मण यांचे आभार मानले होते. याबरोबरच त्याने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचेही निवृत्ती मागे घेण्यासाठी त्याला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले होते.
रायडू नेतृत्व करणार असणाऱ्या हैद्राबाद संघाचा विजय हजारे ट्रॉफीमधील महिला सामना 24 सप्टेंबरला कर्नाटक विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी हैद्राबाद संघात रायडू व्यतिरिक्त मोहम्मद सिराजचाही समावेश आहे. तसेच हैद्राबादचे उपकर्णधारपद बी संदीपला देण्यात आले आहे.
या स्पर्धेतील हैद्राबाद त्यांचे सर्व सामने बंगळूरुला खेळणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीसाठी असा आहे हैद्राबादचा संघ –
अंबाती रायुडू (कर्णधार) बी संदीप (उपकर्णधार), पी अक्षत रेड्डी, तन्मय अगरवाल, ठाकुर वर्मा, रोहित रायडू, सीव्ही मिलिंद, मेहदी हसन, साकेत साई राम, मोहम्मद सिराज, मिकिल जयस्वाल, जे मल्लिकार्जुन (यष्टीरक्षक), कार्तिकेय काक, टी रवी तेजा, आया देव गौड.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून धोनीबरोबरील तो फोटो शेअर केला होता, विराट कोहलीने केला खूलासा, पहा व्हिडिओ
–टीम इंडियाने सातव्यांदा जिंकला १९ वर्षांखालील आशिया चषक; फायनलमध्ये बांगलादेशला केले पराभूत
–संपूर्ण वेळापत्रक: असे होणार आहेत टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२०, कसोटी सामने