Ambati Rayudu: नुकताच अंबाती रायुडू राजकारणात आला होता. त्यानी वायएसआरसीपी पक्षात प्रवेश केला होता, मात्र अवघ्या 8 दिवसात पक्ष सोडत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण आता या क्रिकेटपटूने पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. वास्तविक, अंबाती रायुडूने अभिनेता पवन कल्याण यांना भेटल्यानंतर ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यानी वायएसआरसीपी सोडण्याची आणि आगामी रणनीतीबद्दल सांगितले आहे.
अंबाती रायडू (Ambati Rayudu) याने या पोस्टमध्ये लिहिले की, “मी आंध्र प्रदेशच्या लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. माझे मन आणि हेतू शुद्ध आहेत. मी वायएसआरसीपीमध्ये सामील झालो, मला वाटले की, मी अपेक्षेप्रमाणे लोकांची सेवा करू शकेन. या काळात मी जमिनीवर राहून अनेक गावांना भेटी दिल्या. तसेच अनेकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी माझे 100 टक्के दिले.” (ambati rayudu resign from ysrcp meet pawan anna post going viral on social media)
अंबाती रायुडू पुढे लिहिले की, “मी खूप सामाजिक काम केले आहे. पण काही कारणांमुळे मला असे वाटले की, मी YSRCP पक्षासोबतचे माझे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. मात्र, मी कोणालाही जबाबदार धरत नाही. माजी क्रिकेटपटूने पुढे लिहिले की, माझी आणि वायएसआरसीपी पक्षाची विचारधारा जुळत नसल्याने कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्यात काही अर्थ नाही. या कारणास्तव मी YSRCP सोडण्याचा निर्णय घेतला होता.”
— ATR (@RayuduAmbati) January 10, 2024
त्यानी पुढे लिहिले की, “मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. पण विचारधारा समजून घ्यायची असेल तर आर पवन अण्णांना भेटावे, असे माझे चाहते आणि हितचिंतक म्हणाले. असो, मी पवन अण्णांना भेटलो आणि बराच वेळ एकत्र घालवला. यादरम्यान आम्ही जीवन आणि राजकारणाशी संबंधित अनेक विषयांवर बोललो. मला सांगायचे आहे की, माझी आणि पवन अण्णांची विचारधारा खूप समान आहे. तोही माझ्यासारखाच विचार करतो, त्याला भेटून मला आनंद झाला. यावेळी मी क्रिकेटसाठी दुबईला जाणार असलो तरी आंध्र प्रदेशातील लोकांच्या सेवेसाठी मी सदैव उपस्थित राहीन.” (After leaving YSRCP Rayudu will join JSP hinted by sharing photos with Pawan Kalyan)
हेही वाचा
Virat Kohli । अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून विराटची माघार, ऐन वेळी द्रविडने दिली माहिती
सहाव्या सिटी प्रीमियर लीग(सीपीएल)आंतर क्लब 7-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत डीसी ड्रॅगन्सचा तिसरा विजय