पुणे| पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अनिश पालेशा(42धावा व 3-29) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने मेट्रो क्रिकेट क्लबचा 8 धावांनी पराभव करत सलग तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पूना क्लब क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना मेट्रो क्रिकेट क्लबच्या रेहान खान(5-32), गुरवीर सिंग सैनी(4-53)यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीपुढे अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाचा डाव 30.4षटकात 164 धावावर कोसळला. यात अनिश पालेशा 42, तनिश जैन 25, ऋषिकेश बारणे 22, रोहित हाडके 16 यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी केली. याच्या उत्तरात अँबिशियस क्रिकेट अकादमीच्या अनिष पालेशा(3-29), तनय सांघवी(3-21), तनिश जैन(2-22)यांनी अचूक गोलंदाजी करत मेट्रो क्रिकेट क्लबला 43.5षटकात 156 धावात गुंडाळले यामध्ये शशिकांत पवार 33, प्रशम गांधी 33, रिषभ बन्सल 24, उबेद खान 12, निशांत नगरकर 10 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या लढतीत कन्हैया लड्डा(4-37)याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 36 धावांनी पराभव करत दुसरा विजय नोंदविला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
येवलेवाडी मैदान: ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी: 39.1षटकात सर्वबाद 169 धावा(मेहुल पटेल 48(68,7×4), साहिल औताडे 34(35,7×4), आदर्श बोथरा 33(36,6×4), अजय बोरुडे 3-24, सोहम कुमठेकर 2-24, आयुश काब्रा 1-29) वि.वि.डेक्कन जिमखाना:38.4 षटकात सर्वबाद 133 धावा(धीरज फटांगरे 29(24,4×4,1×6), सोहम कुमठेकर 23(51), यश बोरामणी 17, ओंकार साळुंखे 16, कन्हैया लड्डा 4-37, कार्तिक जाधव 4-18, अजित बागाडी 1-27);सामनावीर-कन्हैया लड्डा; ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी 36 धावांनी विजयी;
पूना क्लब मैदान: अँबिशियस क्रिकेट अकादमी: 30.4षटकात सर्वबाद 164 धावा(अनिश पालेशा 42(30,5×4,3×6), तनिश जैन 25, ऋषिकेश बारणे 22, रोहित हाडके 16, रेहान खान 5-32, गुरवीर सिंग सैनी 4-53) वि.वि.मेट्रो क्रिकेट क्लब: 43.5षटकात सर्वबाद 156 धावा(शशिकांत पवार 33(42,4×4,1×6), प्रशम गांधी 33(49,5×4), रिषभ बन्सल 24, उबेद खान 12, निशांत नगरकर 10, अनिष पालेशा 3-29, तनय सांघवी 3-21, तनिश जैन 2-22);सामनावीर-अनिश पालेशा; अँबिशियस संघ 8 धावांनी विजयी.
महत्त्वाच्या बातम्या-
दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब २५ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत १० संघ सहभागी