पुणे। आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018- 19स्पर्धेत अॅमडॉक्स्, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन व गालाघर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला.
व्हिजन क्रिकेट अकादमी मौदानावर झालेल्या सामन्यात रोहित लालवाणीच्या जलद 66 धावांच्या बळावर अॅमडॉक्स् संघाने सिटी संघाचा 68 धावांनी पराभव करत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना अॅमडॉक्स् संघाने 20 षटकात 7 बाद 198 धावा केल्या. 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हर्षद खटावकर व शुभम घोडेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे सिटी संघ 20 षटकात 7 बाद 130 धावांत गारद झाला. 44 चेंडूत 66 धावा करणारा रोहित लालवाणी सामनावीर ठरला.
लेजेन्डस् क्रिकेट अकादमी मौदानावर झालेल्या लढतीत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने परसिस्टंट सिस्टीम संघाचा 6 गडी राखून पराभव केला, तर गालाघर संघाने व्हेरीटास संघावर 5 धावांनी निसटता विजय मिळवत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
अॅमडॉक्स्- 20 षटकात 7 बाद 198 धावा(रोहित लालवाणी 66(44), अविरल जैन 24, अभिषेक पाटणकर 30(20), भावनीश कोहली नाबाद 49(16), फझलीन डिक्रुझ 2-34) वि.वि सिटी- 20 षटकात 7 बाद 130 धावा(मित अहुजा 24(21), सतिश चव्हाण 32(25), हर्षद खटावकर 3-14, शुभम घोडेकर 2-17) सामनावीर- रोहित लालवाणी
अॅमडॉक्स् संघाने 68 धावांनी सामना जिंकला.
परसिस्टंट सिस्टीम- 19.4 षटकात सर्वबाद 121 धावा(सुधिर परांजपे 28(33), स्वरांग साठे 23(13), स्वप्निल चिखले 3-20) पराभूत वि सॉफ्टहार्ड ऑटोमेशन- 19.2 षटकात 4 बाद 123 धावा(अमित कदम 47(43), रोहन खलाटे 35, विशाल पवार 2-15) सामनावीर- अमित कदम
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.
गालाघर- 20 षटकात सर्वबाद 132 धावा(शुभेंदू पांडे 30, सिध्दार्थ शर्मा 24(17), अमृत अलोक 3-21, मुनीराज तोमर 2-21, सुमित दिघे 2-21) वि.वि व्हेरीटास- 20 षटकात 8 बाद 127 धावा(सुशांत मुळे 22, चिदंबरा 44, सामी अरीफ 3-26, रोशन कदम 2-19) सामनावीर- शुभेंदू पांडे
गालाघर संघाने 5 धावांनी सामना जिंकला.