अलीकडच्या काळात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपल्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली आहे आणि अमेरिकेकडून खेळण्यासाठी वळले आहेत. भारतात क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवणे आणि भारतीय संघाकडून खेळणे हे मोठे जिकरीचे काम होऊन बसले आहे. भारतातूनही काही खेळाडू अमेरिकेत जाऊन कारकीर्द घडवण्याचा विचार करत आहेत. यात भारतीय क्रिकेटपटू उन्मुक्त चंदच्या नावाचाही समावेश आहे, ज्याने नुकतेच भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अमेरिकेच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर, न्यूझीलंडचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसनसारखे खेळाडू देखील या यादीचा भाग आहेत, जे अमेरिकेसाठी खेळताना दिसतील.
त्यामुळे, अमेरिका आता आपला अतिशय मजबूत क्रिकेट संघ तयार करू शकते. आजच्या लेखात आपण अमेरिकेचे प्लेइंग इलेव्हन कसे असतील याबाबत माहिती घेणार आहोत.
अमेरिकन क्रिकेट संघातील सलामीवीरांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे सनी सोहल आणि उन्मुक्त चंद हे दोन भारतीय खेळाडू आहेत. उन्मुक्तच्या नेतृत्वाखाली भारतीय 19 वर्षाखालील संघाने 2012 साली विश्वचषक पटकावला होता. जरी दोघांनाही भारतीय संघात संधी मिळाली नसली, तरी दोघांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे, जर मधल्या फळीकडे पाहिले तर तिसऱ्या क्रमांकासाठी पाकिस्तानचा सामी अस्लम आहे आणि भारताचा यष्टीरक्षक फलंदाज स्मित पटेल चौथ्या स्थानावर खेळू शकतो.
अमेरिकेच्या या संघात पाचव्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून श्रीलंकेच्या शेहान जयसूर्याचे नाव पुढे येत आहे. तर न्यूझीलंडचा कोरी अँडरसनला अष्टपैलू म्हणून सहाव्या स्थानावर स्थान दिले जाऊ शकते. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचे इयान हॉलंड आणि डेन पायड, जुआन थेरॉन आणि सिद्धार्थ त्रिवेदी देखील गोलंदाजीसाठी उपस्थित आहेत.
अमेरिकेचा संभाव्य संघ
सनी सोहल, उन्मुक्त चंद, समी अस्लम, स्मित पटेल, शेहान जयसूर्या, कोरी अँडरसन, इयान हॉलंड, डेन पायड, कॅमरॉन स्टीवन्सन, जुआन थेरॉन आणि सिद्धार्थ त्रिवेदी.
महत्त्वाच्या बातम्या –
शानदार बाबर! दमदार अर्धशतकासह पाकिस्तानच्या कर्णधाराचा आणखी एक विक्रम
भारताच्या सर्वात यशस्वी ५ गोलंदांजामध्ये इशांतचा होऊ शकतो समावेश; फक्त ‘ही’ कामगिरी करण्याची गरज