कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर हा व्हायरस पाकिस्तानातही पसरताना दिसत आहे. पाकिस्तानमधील जवळपास ५०० पेक्षा अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. या व्हायरसची भीती आता पाकिस्तान संघाचा माजी फिरकीपटू गोलंदाज दानिश कनेरियालाही वाटू लागली आहे.
या व्हायरसबद्दल दानिशने (Danish Kaneria) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले आहे. यामध्ये त्याने प्रभू श्रीराम यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे. “प्रभू श्रीराम (Lord Shree Ram) सर्वांना चांगले आरोग्य देतील. कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो,” असे दानिशने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.
दानिश हा पाकिस्तान संघाकडून खेळणारा दुसरा हिंदू क्रिकेटपटू होता.
इराणमधून तीर्थयात्रा करून मायदेशी परतणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये कोरोना व्हायरसची खात्री पटल्यानंतर लागण झालेल्या लोकांची संख्या वाढून शनिवारी (२१ मार्च) ५१० इतकी झाली होती. तर या व्हायरसमुळे आतापर्यंत ३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कराचीमधील एक्स्पो सेंटरला कोविड-१९च्या रुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये बदलण्यात आले आहे. कराची विमानतळावर देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी करण्यात येत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तीने माझं फेसबुक अकाऊंट हॅक केलं, तेव्हापासून मी एफबी वापरणं सोडलं
-आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू
-मुंबई आणि क्रिकेट: मुंबई क्रिकेटचा दैदिप्यमान इतिहास