सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये केएल राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून निवृत्तीची घोषणा केल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही काळानंतर त्यांनी निवृत्तीची पोस्ट हटवली. सांगायचे झाले तर, व्हायरल होत असलेली ही बातमी पूर्णपणे अफवा आहे. भारतीय क्रिकेटपटूने निवृत्तीशी संबंधित कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. व्हायरल होत असलेल्या सर्व पोस्ट पूर्णपणे चुकीच्या आणि बनावट आहेत.
सोशल मीडियावर होत असलेल्या निवृत्तीच्या अफवांमध्ये आता केएल राहुलचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो मैदानामध्ये घाम गाळताना दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ‘एक्स’वर एका युजरने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले आहे, “केएल राहुल दुलीप ट्रॉफी आणि देशांतर्गत कसोटी हंगामासाठी तयारी करत आहे.”
KL Rahul getting ready for the Duleep Trophy and home Test season. 🇮🇳 pic.twitter.com/rVAN8qlYXw
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 23, 2024
राहुलच्या या व्हिडिओवर चाहते त्यांचे मत व्यक्त करत आहेत. एका चाहत्यांनी लिहिले आहे, “केएल राहुल मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे.”
केएल राहुल सध्या ब्रेकवर आहे. दुलीप ट्रॉफीसह तो मैदानावर परतणार आहे. राहुलची दुलीप ट्रॉफीसाठी भारत ‘अ’ संघात निवड झाली आहे. या संघाची कमान शुबमन गिलच्या हाती आहे. राहुल 5 सप्टेंबरला चिन्नास्वामी स्टेडियमवर मैदानात दिसणार आहे. आगमी बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत केएल राहुलचीही निवड होणार असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत राहुलला दुलीप ट्रॉफीच्या माध्यमातून आपली लय पकडायला आवडेल.
राहुलने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 199 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान 226 डावांमध्ये त्याच्या बॅटने 7979 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 17 शतके आणि 54 अर्धशतके आहेत.
हेही वाचा-
ऐकावं ते नवलच! स्वत:च्याच मुलाविरुद्ध मैदानावर उतरला दिग्गज क्रिकेटपटू
विराट तर दुरच, बाबर आझमची तुलना शुबमन गिलशी पण होणार नाही; एकदा आकडेवारी पाहाचं
पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी कोणी जिंकलं पहिलं सुवर्णपदक? वाचा सविस्तर