रविवारी(१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करून पहिले जेतेपद पटकावले. यानंतर ऑस्ट्रेलियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन केले. मात्र, भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज अमित मिश्राने टी२० विश्वविजेत्या संघाचे अभिनंदन करताना एक मोठी गडबड केली. ज्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.
अमित मिश्राने टी२० विश्वविजेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक खास ट्वीट केले, पण त्यामध्ये ऑस्ट्रेलिया ऐवजी न्यूझीलंडचेच नाव टाकले. यानंतर सोशल मीडियावर त्याने केलेले हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अमित मिश्राने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “विश्वचषक जिंकण्यासाठी ब्लॅककॅप्स (न्यूझीलंड) संघाचे अभिनंदन. संघाचे उत्कृष्ट योगदान. तुम्ही खूप अप्रतिम प्रकारे खेळलात.” अशा प्रकारे त्याने सुरुवातील चुकीचे ट्वीट केले होते, पण चूक लक्षात आल्यानंतर हे ट्वीट डिलिट केले आणि ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा देण्यासाठी नवीन ट्वीट केले.
https://twitter.com/MishiAmit/status/1459959374235910144
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या. न्यूझीलंड संघाने ज्या चार विकेट्स गमावल्या, त्यापैकी तीन विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या एकट्या जोस हेजलवुडने घेतल्या. त्याने त्याच्या चार षटकात अवघ्या १६ धावा दिल्या. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झम्पाने एक विकेट्स घेतला आणि २६ धावा दिल्या. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक ८५ धावा केन विलियम्सनने केल्या.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५३ आणि मिशेल मार्शने नाबाद ७७ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजतेपद मिळवून दिले. त्याव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेलनेही नाबाद २८ धावांचे महत्वाचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत ऑस्ट्रेलियाने १७३ धावांचे आव्हान २ विकेट्स गमावत पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! जोश हेडलवूड ‘हा’ विक्रम करणारा युवराज सिंगनंतर जगातील दुसराच खेळाडू
कर्णधार असावा तर असा! धोनीच्या ‘त्या’ शब्दांनी युवा ऋतुराज गायकवाडमध्ये भरला होता आत्मविश्वास