---Advertisement---

इटलीचा पराभव करून इंग्लंडची सुपर 8 मध्ये एन्ट्री; शेवटच्या ओव्हरमध्ये लागला सामन्याचा निकाल

On: सोमवार, फेब्रुवारी 16, 2026 8:26 PM
---Advertisement---

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील २९ वा सामना इंग्लंड आणि इटली यांच्यात खेळला गेला. कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना विशाल धावसंख्या उभारली होती, ज्याला उत्तर देताना इटलीनेही शानदार खेळ दाखवला. अखेर इटलीला पराभवाचा सामना करावा लागला, तरीही हा सामना अत्यंत रोमांचक झाला. इंग्लंडकडून विल जॅक्सने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली. दुसरीकडे, इटलीच्या हॅरी मॅनेन्टीनेही (बेन मॅनेन्टी) आक्रमक अर्धशतक ठोकत उत्कृष्ट खेळ दाखवला. इंग्लंडने हा सामना २४ धावांनी जिंकून सुपर-८ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

​प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० ओव्हर्समध्ये २०२ धावा केल्या होत्या. सलामीवीर फिल साल्टने १५ चेंडूत २८ धावांची खेळी केली. याशिवाय जोस बटलरने ४ चेंडूत ३ धावा केल्या, तर जेकब बेथेलने २० चेंडूत २३ धावांचे योगदान दिले. कर्णधार हॅरी ब्रूकने १९ चेंडूत २५ धावा केल्या. विशेष म्हणजे, विल जॅक्सने २२ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी साकारली, ज्यामध्ये त्याने ३ चौकार आणि ४ षटकार लगावले.

​२०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इटलीने चोख प्रत्युत्तर दिले. शेवटच्या ओव्हरमध्ये संघाला विजयासाठी २५ धावांची गरज होती, परंतु त्यांचा डाव १७८ धावांवर मर्यादित राहिला. सलामीवीर ज्युस्टिन मोस्काने ३४ चेंडूत ४३ धावा केल्या. मात्र, अँथनी मोस्का आणि जेजे स्मट्स खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. हॅरी मॅनेन्टीने ११ चेंडूत १२ धावा केल्या, तर पाचव्या क्रमांकावर आलेल्या बेन मॅनेन्टीने अवघ्या २५ चेंडूत ६० धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ६ षटकार मारले. याशिवाय ग्रँट स्टुअर्टने २३ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. इटलीने २० ओव्हर्समध्ये एकूण १७८ धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---