---Advertisement---

आयएएस अधिकाऱ्याशी भिडला अमित मिश्रा; कारण वाचून कराल प्रशंसा

On: मंगळवार, मे 17, 2022 7:43 PM
Amit-Mishra
---Advertisement---

मोठ्या काळानंतर भारताने थॉमस कप २०२२ जिंकला. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने १४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या इडोनेशियाला पराभूत करून ही मानाची ट्रॉफी जिंकली. ३-० अशा फरकाने भारताने विजय मिळवला. हा कामगिरीसाठी संपूर्ण देशभरातील लोकांकडून भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे. पण अशातच एक आयएएस अधिकारी सोमेश उपाध्याय यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले आहे. त्यांच्या या ट्वीटवर भारतीय फिरकी गोलंदाज अमित मिश्राने प्रत्युत्तर दिले आहे.

सोमेश उपाध्याय या आयएएस अधिकाऱ्याने हे ट्वीट मजेत केल्याचे दिसत आहे. त्यांनी मच्छर मारण्याच्या बॅटचा (Anti Mosquito Racquet) फोटो शेअर केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “इंडोनिशिया देखील हैराण असेल की, भारत बॅडमिंटनमध्ये एवढा चांगला आहे.” अधिकाऱ्याने हे ट्वीट मजेमध्ये जरी केले असले, तरी अमित मिश्रा (Amit Mishra) मात्र त्याच्यावर संतापला. सोमेशच्या ट्वीटला मिश्राने रिट्वीट केले आणि लिहिले की, “हे केवळ लाजिरवाणे नाहीचे, तर आपल्या बॅडमिंटनच्या नायकांचा अपमान आहे.”

दरम्यान, अमित मिश्राने जरी खरपूस शब्दांमध्ये या अधिकाऱ्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली असली, तरी काही चाहते असेही आहे, ज्यांनी या पोस्टला एवढ्या गंभीरपणे घेतले नाहीये. त्यांच्या मते, अधिकाऱ्याने केलेली ही पोस्ट मजेमध्ये केलेली आहे आणि त्यांचा उद्देश वाईट नाहीये. काहींनी याच अधिकाऱ्याने यापूर्वी केलेले ट्वीट्स शेअर केले आहे. सोमेश उपाध्याय यांच्या आधीच्या ट्वीटमध्ये त्यांनी भारताचा बॅडमिंटन संघाचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “ऐतिहासिक थॉमस कप जिंकला. तो देखील एकही सामना न गमावता. वाह, काय दिवस होता.”

उल्लेखनीय आहे की, विजेतेपद पटकावण्यासाठी लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत व्यतिरिक्त सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जगातील आठव्या क्रमांकाच्या जोडीने देखील योगदान दिले. भारताने विजेतेपद पटकावताच सोशल मीडियावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. अनेक दिग्गजांसह स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील संघाला या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

सीएसकेविरूद्धच्या सामन्याआधी राजस्थानच्या गोटात आनंदीआनंद; दुसऱ्या स्थानासाठी दावेदारी मजबूत

एमएस धोनी आणि गॅरी कर्स्टनला एकत्र पाहून सुखावले फॅन्स; पाहा खास व्हिडिओ

फक्त १० सामन्यांत चहल मोडणार विराटचा ९७३ आयपीएल धावांचा विक्रम? पाहा नक्की काय आहे प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---