भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा (amit mishra) याने आयपीएलच्या (IPL) पुढच्या हंगामात खेळण्याचे संकेत दिले आहेत. मागच्या वर्षी मिश्रा दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. परंतु दिल्ली कॅपटिल्सने पुढच्या हंगामासाठी त्याला संघात कायम न ठेवता रिलीज केले आहे. असे असले तरी, त्याला आशा आहे की, दिल्ली कॅपिटल्स त्याला लिलावात पुन्हा विकत घेईल.
अमित मिश्रा म्हणाला की, “खर सांगायचे तर, मला माहीत नाहीय की मी कुठपर्यंत खेळू शकतो. मात्र, जेवढे होईल तेवढे मी खेळण्याच्या प्रयत्न करेल. मी माझी तयारी सुरू केली आहे. मी माझ्या फिटनेसवर लक्ष देत आहे, माझ्या डायटवर लक्ष देत आहे. तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करत आहे. फिट राहण्यासाठी क्रिकेटपटूचे मैदानावर असणे गरजेचे आहे, तेव्हाच तो फिट राहू शकतो. दुसरा कोणताच मार्ग नाही आणि मी अगदी तोच प्रयत्न करत आहे. खेळण्याच्या आणि सरावाच्या प्रत्येक संधीचा शोध घेत आहे.”
पुढच्या हंगामात देखील मिश्रा दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळू इच्छितो. याबाबतीत बोलताना तो म्हणाला, “मी इमानदारीने सांगेल, मी खोट बोलत नाही. मी दिल्लीसाठी अनेक हंगाम खेळलो आहे. त्यांच्याशी जवळीक नक्कीच आहे. चाहतेही माझ्यावर प्रेम करतात. जेव्हा कधी मी संघासाठी मैदानात उतरतो, तेव्हा चाहते स्टॅन्ड्समधून मला प्रेमाने आवाज देतात. तुम्ही मैदानाशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी देखील जोडले गेलेले असता. तुम्हाला स्वतःच्या संघाविषयी सर्वकाही माहिती असते, त्यांना तुमच्याविषयी सर्वकाही माहिती असते. त्यामुळे खूप चांगले होईल, जर त्यांनी मला पुन्हा निवडले. परंतु एका प्रोफेशनल क्रिकेटपटूच्या रूपात, जी फ्रेंचायझी मला निवडेल, मी त्यांच्यासाठी माझे शंभर टक्के देईल, जे मी नेहमीच केले आहे.”
आमित मिश्राची आयपीएल कारकीर्द
दरम्यान, अमित मिश्राची आयपीएल कारकीर्द पाहता, तो दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या फ्रेंचायझीसाठी खेळला आहे. सध्या तो आयपीएलमध्ये तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या १५४ साम्यांमध्ये २३.९५ च्या सरासरीने १६६ विकेट्स नावावर केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७.३५ च्या इकोनॉमीने गोलंदाजी केली.
महत्वाच्या बातम्या –
अय्यर-सिराजचे ‘झिंगाट’ थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन; पाहा मजेदार व्हिडिओ
रिषभ पंत, श्रेयस अय्यर उपलब्ध असतानाही बुमराहला उपकर्णधार पद का दिले? जाणून घ्या कारण
व्हिडिओ पाहा –