आयपीएल 2024 पूर्वी रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबत दिग्गज फिरकीपटू अमित मिश्रा यानं मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अमित मिश्राच्या मते, रोहित या निर्णयामुळे नाराज होता. मिश्राच्या मते, रोहित शर्मा जगाला दाखवत नव्हता की तो या निर्णयामुळे नाराज आहे.
वास्तविक, आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं एक मोठा निर्णय घेतला. फ्रॅन्चाईझीनं रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवलं. मात्र मुंबईच्या या निर्णयामुळे चाहते खूश नव्हते. यामुळे मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्यावर भरपूर टीका देखील करण्यात आली.
अमित मिश्रानं एका पॉडकास्ट दरम्यान बोलताना सांगितलं की, “मी असं म्हणणार नाही की रोहित शर्मा आयपीएल दरम्यान खूश होता. मला तर असंच वाटत होतं की त्यानं कोणाला तसं दाखवलं नाही. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला 5 ट्रॉफी जिंकवून देतो, तेव्हा तुम्ही हार्दिक सारख्याला घेऊन येता तर त्याला उपकर्णधार बनवायला हवं होतं. आधी एक वर्ष तुम्ही त्याला उपकर्णधार बनवू शकले असते आणि त्यानंतर त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं असतं. तुम्ही रोहित शर्माकडे या गोष्टी क्लियर करू शकले असते की, तू यावर्षी कर्णधार आहेस मात्र पुढच्या वर्षी हार्दिक कर्णधार असेल. रोहित शर्मा या गोष्टीमुळे खूपच निराश होता. तो खूप भावूक व्यक्ती आहे.”
विशेष म्हणजे, आयपीएल 2024 दरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो केकेआरचे फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलताना, हा माझा शेवटचा हंगाम आहे, असं म्हणत होता.
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच खराब राहिली. संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राहिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?
“प्रसिद्धी आणि सत्तेने विराट बदलला, तर रोहितचा स्वभाव..”, संघातील सहकारी खेळाडूनेच केले खळबळजनक विधान
रिंकू सिंहबाबत बॅटिंग कोचची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, “त्याला कसोटीत संधी मिळाली तर…”