---Advertisement---

पीएमडीटीए मानांकन वरिष्ठ व हौशी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत अमित शर्माला विजेतेपद

On: गुरूवार, जानेवारी 6, 2022 6:38 PM
All the group winner and runner up with the trophy
---Advertisement---

पुणे। टेनिस एसेस यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने पीएमडीटीए मानांकन वरिष्ठ व हौशी टेनिस स्पर्धेत एकेरीत अमित शर्मा याने तर, दुहेरीत रवी कोठारी व राहुल कोठारी यांनी विजेतेपद पटकावले.

एसेस स्पोर्ट्स अरेना टेनिस कोर्ट उंड्री येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत अमित शर्मा याने विवेक खडगेचा 6-3 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पहिल्या सामन्यात विवेक खडगेने सूर्यप्रताप निंबाळकरचा 6-3 असा तर, अमित शर्माने राहुल कोठारीचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली.

दुहेरीत अंतिम फेरीत रवी कोठारी व राहुल कोठारी यांनी सुनील लुल्ला व आदित्य व्यास या जोडीचा 6-4 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, 200 पीएमडीटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक, 140 पीएमडीटीए गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बद्री पुनावाला आणि आशा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक दत्ता शिंदे यांनी लिहिलेलं भरारी हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.यावेळी सुनील लुल्ला, होझिफा हकीम, तैझुन हकीम, प्रफुल नागवानी आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल:
एकेरी: उपांत्य फेरी: विवेक खडगे वि.वि.सूर्यप्रताप निंबाळकर 6-3; अमित शर्मा वि.वि.राहुल कोठारी 6-4;
अंतिम फेरी: अमित शर्मा वि.वि.विवेक खडगे 6-3;

दुहेरी: अंतिम फेरी: रवी कोठारी/राहुल कोठारी वि.वि.सुनील लुल्ला/आदित्य व्यास 6-4.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत ३१ संघ सहभागी, ८ जानेवारीपासून स्पर्धेस प्रारंभ

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत 18 व्या मानांकित कारास्तेवसह अव्वल 100 खेळाडूमधील आठ खेळाडूंचे आकर्षण

पीएमडीटीए मानांकन वरिष्ठ व हौशी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंकित कापसे, नरेश अरोरा, नरेंद्र पवार, अमित शर्मा यांची आगेकूच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---